मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे विहार तलाव देखील भरलं;  एकूण पाणीसाठा 85.68 %
Vihar Lake (Photo Credits: Twitter/ ANI)

मुंबईमध्ये मागील महिन्याभरात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणक्षेत्रामध्ये पाण्याच्या साठ्यात वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सात तलावांपैकी चार तलावं ओव्हर फ्लो झाली आहे. 31 जुलैच्या रात्री विहार (Vihar Lake) हे चौथे धरण यंदा भरून वाहण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी तुळशी, तानसा, मोडकसागर ही तलावं भरून वाहण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या मध्य वैतरणा, भातसा धरणाचे दरवाजे देखील आता खुले करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये सध्या 85% पाणी साठा असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुंबईला तुळशी, तानसा, मोडकसागर,विहार, वैतरणा, भातसा, अप्पर वैतरणामधून पाणी पुरवठा होतो. मागील वर्षी पावसाच्या निराशाजनक कामगिरीमुळे नोव्हेंबर महिन्यापासून 10% पाणी कपात लागू करण्यात आली होती. आता ही पाणीकपात रद्द होणार का? याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

ANI Tweet

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुळशी धरण 12 जुलै दिवशी पहिल्यांदा भरले. त्यानंतर तानसा 25 जुलै आणि मोडकसागर 26 जुलै दिवशी भरले.