Rainfall in Mumbai City | File Photo (Photo Credit: ANI)

Mumbai Rain: मुंबईतून गेल्या काही दिवसांपासून नाहीसा झालेल्या पावसाने आज अचानक सकाळपासूनच जोर धरला. मुंबईत पडणा-या या मुसळधार पावसाने ब-याच सखल भागात पाणी साचले असून भायखळ्यातील जिजामाता उद्यानाबाहेर देखील पाणी साचले आहे. ऐन कामाच्या वेळी अचानक सुरु झालेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. मात्र या पावसाचा मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणा-या रेल्वेवर काही परिणाम झाला नसल्याने नोकरदार वर्गाला दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कमी झालेला थोडक्यात गायब झालेल्या पावसाने मुंबईत (Mumbai) आज अचानक सकाळपासूनच कोसळधार सुरु केली. अचानक सुरु झालेल्या या पावसामुळे मुंबईकरांची अक्षरश: तारांबळ उडाली. यात मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचले तर भायखळ्याच्या जिजामाता उद्यानाबाहेरील रस्त्यावर पाणी साचले. यामुळे या मार्गावरुन प्रवास करणा-या लोकांचे प्रचंड हाल झाले.

जुलै महिन्यापासून सुरु झालेल्या पावसाने संपुर्ण महाराष्ट्रात अक्षरश: हैदोस घातला होता. या पावसाने कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या भागात अक्षरश: पूरस्थिती निर्माण केली. मात्र काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र पुन्हा एकदा दडी मारलेल्या या पावसाने मुंबईत मुसळधार कोसळण्यास सुरुवात केली. हेदेखील वाचा- Pune Rain: पुणे, बारामती मध्ये पावसाचा हाहाकार; नागरिकांनी शेअर केले पावसाच्या रौद्ररूपाचे व्हिडिओज आणि फोटोज

तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही तासांत मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.