Mumbai Rains: मुंबईत आजही पावसाची धुवाधार बॅटींग(Mumbai Heavy Rain) सुरू आहे. पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. काही ठिकाणी गुडघाभर पाण्यातून नागरिक वाट काढून प्रवास करत आहेत. साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. अंधेरी सब-वे वाहतूकीसाठी बंद करण्यात आला( Andheri subway closed) आहे. मुंबईत आज हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला(Mumbai Weather Forecast) आहे. त्यातही आज रविवार आसल्याकारणाने अनेक जण पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडत आहे. मात्र, वाहतूक कोंडी कमी असल्याने तेवढा परिणाम जाणवलेला नाही. (हेही वाचा:Mumbai Rains: किनारपट्टी भागात जाणे टाळा, गरज असल्यास घराबाहेर पडा; मुंबई पोलिसांकडून सतर्कतेचे आवाहन )
मिळालेल्या माहितीनुसार, किंग सर्कल, दादर टीटी, अंधेरी सब-वे, कांदिवली, वाकोला, कुर्ला या ठिकाणी रविवारी वाहतूक संथ गतीने सुरू होती. दरम्यान, मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस झाल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. त्याशिवाय अंधेरी सबवे येथेही पाणी साचले होते.
मुंबई कोकणासह काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिका आदी विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सतर्क राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. (हेही वाचा: Maharashtra Rains: गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; पुरामुळे 120 गावांचा संपर्क तुटला)
पोस्ट पहा
Mumbai: The Andheri subway closes for vehicular traffic due to heavy rainfall pic.twitter.com/2Iyxi6FMr8
— IANS (@ians_india) July 21, 2024
दुसरीकडे नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर परिसरातही रविवारी सकाळपासून पावसाने चांगलाच जोर धरला. कुर्ला एलबीएस रोड परिसरातही पाणी साचल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. मिलन सबवे येथेही शनिवारी रात्री अपघात झाल्यामुळे येथील वाहतुकीचा वेग देखील मंदावला होता. पहाटे पावसाचा रेल्वे वाहतूकीवरही परिणाम झाला. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.