Mumbai Rains: मुंबईत सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Rain)जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर पाहून नागरिकांनी किनारपट्टी भागात जाणे टाळावे तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन मुंबईकरांना पोलिसांकडून(Mumbai Police) करण्यात आले आहे. त्याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत 100 क्रमांक डायल करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाची जोरदार हजेरी पहायला मिळत आहे. त्यावर सतर्कतेचे पाऊल हे नेहमीच मुंबई पोलिसांकडून उचलण्यात येते. (हेही वाचा:Tulsi Lake Overflow: मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव ओव्हरफ्लो (Watch Video) )

पोस्ट पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)