जर तुम्ही आज मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून (Mumbai-Pune Expressway) प्रवास करणार असाल तर ही अतिशय महत्वाची बातमी आहे. एक्सप्रेस वेवरील पुण्याच्या (Pune) दिशेने जाणारी वाहतूक आज म्हणजे शुक्रवारी दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 2 वाजता दरम्यान वाहतूक पूर्णत: बंद असेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे. मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवरील लोणावळ्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आज ग्रँटी बसविण्याचे काम पुर्ण करण्यासाठी हा विशेष ब्लॉक (Special Block) घेण्यात येत आहे. (हेही वाचा - Thane: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चक्क रिक्षाचालक जारी करत आहे चालान; आरटीओ अधिकारीही घटनास्थळी उपस्थित, चौकशी सुरु (Watch Video))
मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर आज दुपारी 12 ते 2 वाजेच्या वेळेत पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. या ब्लॉकमुळे मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून आज दोन तासांत ओव्हरहेड गॅन्ट्री बसवली जाईल. याच गॅन्ट्रीवर पुढच्या काळात सीसीटीव्ही बसविले जातील. मुंबई पुणे महामार्गावर होणारे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या दोन तासांच्या विशेष ब्लॉकमुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. खंडाळ्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावरून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांना वळवण पथकर नाक्यावरून पुढे पुण्याच्या दिशेने मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरुन जाता येईल.