Mumbai-Pune Expressway Accident | (Photo Credit- ANI)

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर (Mumbai-Pune Expressway) झालेल्या भीषण अपघातात 5 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बोरघाटात (Bhor Ghat Accident) घडली. आर्टीगा कारने मुंबईच्या दिशेने येत असताना गुरुवारी (17 नोव्हेंबर) मध्यरात्री हा अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की, अपघातग्रस्त कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातामुळे पुण्याहून मुंबईच्या (Mumbai News) दिशेने येणाऱ्या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन मदत आणि बचाव कार्य सुरु केले. तसेच, वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या.

अब्दुल रहमान खान (32 वर्षे, घाटकोपर), अनिल सुनिल सानप, वसीम साजिद काझी (रा.राजापूर, जि. रत्नागिरी), राहुल कुमार पांडे (वय-30 वर्षे, कामोठे, नवी मुंबई), आशुतोष नवनाथ गांडेकर (23वर्षे अंधेरी, मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. तर, मच्छिंद्र आंबोरे (वय 38 वर्ष, वाहन चालक) अमीरउल्ला चौधरी, दिपक खैराल अशी गंभीर जखमींची नावे आहेत. अस्फीया रईस चौधरी (25 वर्षे. कुर्ला, मुंबई) ही महिला किरकोळ जखमी झाली आहे. (हेही वाचा, karnataka: भरधाव कारची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार हवेत उडून जमीनमवर आपटला; भयावह अपघात सीसीटीव्हीत कैद, पाहा व्हिडिओ)

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना नवी मुंंबई येथील रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातग्रस्त कार मुख्य रस्त्यावरुन हवटून बाजूला घेतली आहे. पंचनामा करुन मृतदेहही ताब्यात घेतले आहेत. ताब्यात घेतलेल्या मृतदेहांचे शवविच्छेदन केले जाणार असल्याचे समजते आहे.

ट्विट

मुंबई पुणे एक्स्प्रेसवर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने बोरघाटात होणारे अपघात अधिक वाढले आहेत. या अपघातांना रस्तेबांधणीतील चुका की वाहन चालवताना होणाऱ्या मानवी चुका? हा सवाल नेहमीच उपस्थित केला जातो आहे. सरकारने या घटनांचा आढावा घेऊन तातडीने हालचाली कराव्यात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी धोरण ठरवावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे.