पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (7 सप्टेंबर) एकदिवसीय महाराष्ट्र दौर्यावर आले आहेत. आज ते मुंबई आणि औरंगाबाद शहराला भेट देणार आहेत. आज त्यांनी मुंबईत दाखल होतच पार्ले येथील लोकमान्य सेवा संघ टिळक मंदीर येथील गणपतीला भेट दिली. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास लोकमान्य टिळक यांनी सुरूवात केली. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी नियोजित कार्यामध्ये नसतानाही लोकमान्य सेवा संघाचं आमंत्रण स्वीकरत तेथील गणपतीची पूजा करत प्रार्थना केली. यंदा या मंडळाचे 100 वे वर्ष आहे. नरेंद्र मोदी मुंबईत आज मेट्रो प्रकल्पाचे लोकार्पण करणार आहेत. तसेच औरंगाबाद शहरातील औद्योगिक विकासकामांचा आढावा घेत त्यांचेही लोकार्पण करणार आहेत. मुसळधार पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या नागपूर दौरा रद्द
मुंबई, औरंगाबाद सोबत आज मोदी नागपूर शहरालाही भेट देणार होते मात्र पावासाच्या रेड अलर्टमुळे त्यांचा नागपूर दौरा रद्द करण्यात आला आहे. औरंगाबदमध्ये आज मोदी बचतगटांच्या महिलांशी संपर्क साधणार आहेत.
ANI Tweet
Mumbai: Prime Minister Narendra Modi offers prayers at Lokmanya Seva Sangh Tilak Mandir in Vile Parle. pic.twitter.com/qovGdZUP8k
— ANI (@ANI) September 7, 2019
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच्या तारखा येत्या काही दिवसातच जाहीर होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर भाजपकडून बड्या भाजपा नेत्यांच्या सभा आणि भेटी आणि लोकार्पण सोहळ्यांचा धडाका सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वी अमित शहा देखील महाराष्ट्र दौर्यावर आले होते.