PN Tukaram Thokal (Photo Credits: Twitter/ Mumbai Police)

"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" या ब्रीद वाक्याला न्याय देऊन ऑन ड्युटी पोलीस नाईक तुकाराम ठोकळ (Tukaram Thokal)  यांनी मुंबई पोलिसांचे (Mumbai Police)  नाव राखले आहे. अलीकडेच भायखळा (Buyculla) पूलाजवळ तुकाराम यांना 50 हजार रोख रक्कम असलेली एक बॅग आढळली. इतकी रक्कम पाहून जिथे कोणच्याही मनात लालसा निर्माण होईल तिथे तुकराम यांनी प्रामाणिकपणा दाखवत या बागेच्या मालकाचा शोध घेऊन त्यांना ही बॅग पुन्हा सुपूर्त केली. त्यांच्या या कार्यतत्परतेचे आणि प्रामाणिकपणाचे कौतुक करत मुंबई पोलिसांनी सुद्धा एक ट्विट केले आहे.

मुंबई पोलीस ट्विट

तुकाराम ठोकळ काही दिवसांपूर्वी भायखळा येथे ड्युटीवर असताना भायखळा पुलावर ५०,००० रुपयांनी गच्च भरलेली एक बॅग त्यांना आढळली. त्यांनी ती लगेच ताब्यात घेतली. व बागेच्या मालकाचा शोध घ्यायला सुरवात केली. काहीच वेळात जितेंद्र सोनी नामक एक गृहस्थ त्या बागेचा शोध घेत पुन्हा भायखळा पुलावर आले. त्यावेळी त्यांची प्राथमिक चौकशी करून तुकाराम यांनी टी बॅग त्यांना सुपूर्त केली. बाईकवरून जात असताना सोनी यांच्या अनावधानाने ती बॅग भायखळा पुलावर पडली होती, मात्र तुकाराम ठोकळ यांनी ही बॅग देताच त्यांनी सुटकेचा श्वास सोडला. यानंतर सोनी यांनीही ठोकळ यांचे आभार मानले आहेत. अमिताभ बच्चन यांनी भेटीला आणली Mumbai Police ची दमदार Quick Response Team,पहा खास Video

तुकाराम ठोकळ यांच्या कामगिरीचा वृत्तांत देत मुंबई पोलिसांनी #MumbaiFirst हा हॅशटॅग वापरून कौतुक केले आहे.