अमिताभ बच्चन यांनी भेटीला आणली Mumbai Police ची  दमदार Quick Response Team,पहा खास Video
Mumbai Police's Quick Response Team Watch Video (Photo Credits: Twitter)

Quick Response Team of Mumbai Police:  बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी रूपेरी पडद्यावर अनेक दर्जेदार भूमिका निभवल्या आहेत, यामध्ये पोलिस वर्दीतल्या अ‍ॅंग्री यंग मॅनलाही त्यांनी साकरलं आहे. पण आज मुंबईच्या संरक्षणासाठी चोवीस तास सज्ज असणार्‍या मुंबई पोलिसांसाठी (Mumbai Police) केलेल्या खास व्हिडिओची एक क्लिप विशेष लक्षवेधी ठरत आहे. अमिताभ बच्चन यांनी मुंबई पोलिसांच्या सुसज्ज Quick Response Team ची झलक सोशल मीडीयाच्या माध्यमातून दाखवली आहे.

मुंबई पोलिसांच्या नव्या क्विक रिस्पॉन्स टीमला कमांडरकडून प्रगत प्रशिक्षण देण्यात आलं आहे. 26/11 सारख्या मुंबईला हादरवणार्‍या दहशतवादी हल्ल्यासारख्या कोणत्याही हल्ल्याचा सामना करण्यासाठी ट्रेनिंग देण्यात आलं आहे. मुंबई सह मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी ही नवी टीम तैनात असेल असे सांगण्यात आले आहे. मुंबई लोकलवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता; मुंबईसह महाराष्ट्रात अतिदक्षतेचा इशारा

 

Quick Response Team काय करणार?

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये मुंबई शहर, तीर्थक्षेत्र, मुंबई लोकल्स ही हीटलिस्टवर असण्याची शक्यता आहे. अशावेळेस भविष्यातील दहशतवादी हल्ल्याची शक्यता लक्षात घेता मुंबई पोलिसांच्या सोबतीला Quick Response Team देण्यात आली आहे. या टीममधील जवान तरूण, अत्यंत फीट, पूर्ण सुसज्ज असतील. कमीत कमी वेळेत आणि जलद धोका कमी करण्यासाठी, सुरक्षा चोख ठेवण्यास ही टीम करणार आहे.

अमिताभ बच्चन यांची ही खास क्लिप यश राज फिल्म  निर्मित  आहे तर अली अब्बास जाफर याने क्लिपचं दिग्दर्शन केलं आहे.