International Internet Day 2020 चं औचित्य साधत मुंबई पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित व्यवहार करण्याचा सल्ला देत Scratch Card Rewards च्या धोकादायक ट्रेंड बाबत केलं अलर्ट!
Cyber Crime | Photo Credits: Pixabay.com

मुंबई पोलिस (Mumbai Police) सोशल मीडियामध्ये प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत. नागरिकांना सजग ठेवण्यासाठी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर एकापेक्षा एक इंटरेस्टिंग आणि क्रिएटीव्ह ट्विट्स पहायला मिळतात. आज (29 ऑक्टोबर) म्हणजेच International Internet Day. सध्या कोरोना वायरसचं संकट घोंघावत असताना अनेक जण सुरक्षित राहण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग आणि व्यवहारांचा पर्याय निवडत आहेत. पण या परिस्थितीचादेखील काही समाजकंटक चूकीचा फायदा उचलत आहे. सायबर क्राईम रेट पाहता पोलिसांनी आज इंटरनेट डेचं औचित्य साधत नागरिकांना सुरक्षित व्यवहार करण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच त्यांनी इंटरनेटवरील काही धोकादायक ट्रेंड बद्दलही अलर्ट केले आहे.

सध्या इंटरनेटवर Scratch Card Rewards चा एक धोकादायक ट्रेंड आहे. यामधून नागरिकांची आर्थिक लूट होऊ शकते. दरम्यान 'स्क्रॅच-कार्ड' द्वारे बक्षीस मिळवण्याकरिता आपल्याला आपला यूपीआय पिन टाकण्याची आवश्यकता नसते. कुठल्याही संकेतस्थळाने यूपीआय पिन मागितल्यास तो देऊ नका. असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. युपीआय पिन नंबर शेअर केल्यास तुम्ही चोरांच्या हातात तिजोरीच्या चाव्या देण्यासारखं आहे. त्यामुळे कधीच ऑनलाईन तुमचा युपीआय पिन शेअर करू नका. यामध्ये बक्षीसाचा मोह दाखवत तुम्हांंला थर्ड  पार्टी  साईट वर नेलं हातं आणि पैसे लुटण्याचा धोका असतो.  युपीआय पिन प्रमाणेच आजकाल बॅंकेचे व्यवहार अनेकदा सुरक्षित व्यवहार करताना ते ओटीपी देऊन करण्याची पद्धत आहे. त्यामुळे तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सुरक्षित ठेवा आणि योग्य ठिकाणीच वापरा. तो थेट शेअर करू नका. Lockdown मुळे सायबर क्राईम मध्ये मोठी वाढ; Porn Sites पाहणाऱ्यांना गंडा घालण्यासाठी वापरली जातेय 'ही' नवी ट्रीक

मुंबई पोलिस ट्वीट

29 ऑक्टोबर 1969 पासून जगभरात इंटरनेटचा वापर करण्याला सुरूवात झाली. त्यानंतर 2005 साली प्रत्येक वर्षी 29 ऑक्टोबर हा इंटरनेट डे साजरा करण्याला सुरूवात झाली. पुढील वर्षभरात हा दिवस 'आंतरराष्ट्रीय इंटरनेट डे' म्हणून साजरा केला जाऊ लागला.