Lockdown मुळे सायबर क्राईम मध्ये मोठी वाढ; Porn Sites पाहणाऱ्यांना गंडा घालण्यासाठी वापरली जातेय 'ही' नवी ट्रीक
Image For Representation (Photo Credit: File Photo))

कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन (Lockdown) मुळे देशातील अनेक भागात गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्याचे समजत आहे, मात्र प्रत्यक्ष गुन्हे होत नसले तरी ऑनलाईन माध्यमातून लोकांना गंडा (Online Frauds)  घालण्याचे काम मोठ्या प्रमाणावर होत आहे असेही निरीक्षणातून समोर आले आहे. आकडेवारीनुसार मागील काहीच दिवसात महाराष्ट्र राज्यात  विविध जिल्ह्यातील तब्बल 227 जणांवर ऑनलाईन फ्रॉडचे गुन्हे दाखल झाले आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाच्या (Maharashtra Cyber Cell) माहितीनुसार,यामध्ये सर्वाधिक फटका हा पॉर्न साईट्स वापरणाऱ्या मंडळींना बसत आहे. यापूर्वी, पॉर्न साईटवरून (Porn Sites) नोटिफिकेशन, मेल पाठवून सुद्धा लोकांना हजारो रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले होते मात्र यावेळेस या गुन्हेगारांनी वेगळी ट्रीक अवलंबली आहे, याबाबत सविस्तर जाणून घ्या.

महाराष्ट्र सायबर विभागाचे अधिकारी बलसिंह राजपूत यांच्या माहितीनुसार अलीकडेच आलेल्या तक्रारीच्या तपासात समोर आले की, काही हॅकर्सनी पॉर्न साईटच्या माध्यमातून लोकांना धमकावून पैसे उकळण्याचे काम सुरु केले आहे. ही मंडळी पॉर्नसाईटच्या अल्गोरिदम मध्ये व्हायरस टाकतात. यामुळे जेव्हा कोणीही ही साईट आपल्या डेस्कटॉप स्थवा मोबाईलवर सुरु करतं तेव्हा त्या व्यक्तीची माहिती, फोनमधील कॉन्टॅक्टस आणि आणि त्यांच्या डेस्कचा Acess हॅकर्सला मिळतो. तेव्हा पॉर्न बघत असतानाचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून नंतर हे फुटेज लीक करू अशी धमकी देत युजरकडून पैशांची मागणी केली जाते. Lock Down मध्ये पॉर्न पाहणाऱ्या भारतीयांची संख्या 95% वाढली; Pornhub वर सर्वात जास्त सर्च होतंय COVID आणि Corona!

पॉर्न साईटवरून होणाऱ्या या फ्रॉड मध्ये थेट रक्कम मागण्याऐवजी बिटकॉइनच्या माध्यमातून पेमेंट करण्यास सांगितले जात आहे, अलीकडे अशाच एका प्रकरणात तब्बल 2900$  बिटकॉइनची मागणी करण्यात आली होती, वेळीच पेमेंट न केल्यास हे फुटेज लीक करण्याची धमकी दिली गेली होती.

दरम्यान, बीड जिल्ह्यात या गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक असून आतापर्यंत 26 गुन्हे हे बीड मध्ये नोंदवण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ मुंबई, पुणे, कोल्हापूर, जळगाव, सांगली या भागात सुद्धा हा ऑनलाईन क्राईम वाढत आहे.