कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकार द्वारे 21 दिवसांचे लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व नोकरदार, विद्यार्थी, घरात अडकून पडले आहेत. अशावेळी घरबसल्या काय करावं याविषयी प्रत्येकालाच प्रश्न आहे. काहींना याच प्रश्नाची उत्सुकता थेट पॉर्न साईट्सपर्यंत (Porn Sites) घेऊन गेली आहे. पॉर्नहब (Pornhub) या सेक्स व्हिडीओज (Sex Videos) साईटच्या अहवालानुसार, मागील 14 दिवसात पॉर्न पाहणाऱ्या भारतीयांची संख्या ही 95% वाढली आहे. याबाबत 2 एप्रिल रोजी सविस्तर अहवाल जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पॉर्न पाहताना सुद्धा ही मंडळी कोविद आणि कोरोना हे दोन शब्द वारंवार सर्च करत आहेत. भारतातील 91 टक्के युझर्स हे मोबाईलवरुन पॉर्न पाहत असल्याचे सुद्धा या अहवालातून समोर आले आहे. Coronavirus थीम असलेल्या पॉर्नचा धुमाकूळ?; XXX व्हिडीओ स्ट्रीमिंग साइट Pornhub ने सादर केले कोरोना व्हायरसची भीती कमी करण्यासाठी Porn Videos
जगभरावर कोरोनाचे संकट येताच अनेक देशांनी लॉक डाऊनचा मार्ग स्वीकारला आहे. अशावेळी लोकांना घरबसल्या उद्योग म्हणून पॉर्नहबने वेबसाईटवरील प्रिमियम कंटेंट जगभरातील सर्व देशांमध्ये एका महिन्यासाठी मोफत उपलब्ध करुन देत असल्याची घोषणा केली होती. यामुळे साहजिकच साईटवर येणाऱ्या युझर्सच्या संख्येत वाढ झाली. घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी भारतीयांची संख्या चक्क 86. 4 टक्क्यांनी वाढली होती, तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच 27 मार्च रोजी साईटवरील प्रिमियम कंटेंट पाहणाऱ्या भारतीयांची संख्या 95. 3 टक्क्यांनी वाढल्याचे पाहयला मिळत आहे. एकंदरीत आकडेवारीनुसार पॉर्नहब वरील युजर्स मध्ये सर्वाधिक वाढ ही भारतीय लोकांची झालेली दिसून येत आहे.
दरम्यान, आश्चर्याची बाब म्हणजे भारत सरकारने 2018 मध्येच मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना 827 पॉर्न कंटेंट पुरवणाऱ्या साईटवर बंदी घालण्यास सांगितले होते.मात्र तरी देशामध्ये व्हिपीएनद्वारे पॉर्न वेबसाइट्स पहिल्या जात आहेत. देशात लागू करण्यात आलेले लॉक डाऊन हे अजून 7 दिवस शिल्लक आहे आणि आकडेवारी पाहता उभेही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे याकाळात ही पॉर्न बघणार्यांची आकडेवारी सुद्धा वाढू शकते.