
कोरोनाव्हायरसची (Coronavirus) भीती जगात व्हायरसप्रमाणेच पसरत आहे. कोविड-19 (COVID-19) संबंधित ताज्या बातम्यांनी जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. याक्षणी ही अत्यंत गंभीर परिस्थिती समजली आहे. एकीकडे संशोधक या विषाणूवर लस शोधण्याचा प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे विविध देशांचे सरकार या विषाणूशी लढण्यासाठी उपाययोजना करीत आहे. अशात पॉर्नहब (Pornhub) या XXX व्हिडीओ वेबसाईटने कोरोनाव्हायरसची भीती कमी करण्यासाठी एक विचित्र पर्याय शोधून काढला आहे. पॉर्नहबच्या मते कोविड-19 थीम असलेले अश्लील व्हिडिओ पाहून कोरोनाव्हायरसच्या भीतीचा सामना करणे शक्य आहे.
रिपोर्ट्सनुसार, या साइटवर कोरोनाव्हायरस-थीम पॉर्न असलेले 100 पेक्षा जास्त व्हिडिओ व्हायरल होत आहेत. व्हाइस रिपोर्टनुसार, पॉर्नहबवर जर का तुम्ही 'कोरोना व्हायरस' हा कीवर्ड सर्च केलात, तर जवळजवळ 112 व्हिडिओज आपणाला दिसून येतील. या व्हिडीओजची नावेदेखील फार विचित्र आणि मजेशीर आहेत. उदा- 'MILF In Coronavirus Quarantine Gets Hard F***ed तसेच Medicine' and 'Coronavirus patients f**k in quarantine room.' कदाचित वुहान आणि चीनमध्ये कोरोनाव्हायरसचा उद्रेक प्रथम झाल्याने, यातील बर्याच व्हिडिओंमध्ये आशियातील महिला दाखविल्या गेल्या आहेत.
व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या एका व्यक्तीशी व्हाइसचे बोलणे झाले. त्यावेळी ती व्यक्ती म्हणाली, 'मला असे वाटते की लोक, भीतीदायक असूनही जसे हॉरर चित्रपटांकडे आकर्षित होतात, तसेच ते या कोविड-19 थीम असलेल्या पॉर्नकडे आकर्षित झाले आहेत. अखेर आपण सर्वजण अशा गोष्टींचा शोध घेत असतो, ज्या आपल्याला जिवंत ठेवतील. कोविड-19 ही एक गोष्ट आहे जिने सध्या जगात प्रत्येकासाठी भय आणि रहस्य निर्माण केले आहे.'
यातील काही व्हिडीओजच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचेही काम केले गेले आहे. जसे की, जेव्हा जोडपी सेक्ससाठी भेटतात तेव्हा ते आपले कपडे काढतात, मात्र आपल्या चेहऱ्यावरील मास्क तसाच ठेवतात. अशाप्रकारे हे व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. (हेही वाचा: आता प्राण्यांनाही कोरोना व्हायरसचा धोका; Covid-19 ची लागण झालेल्या व्यक्तीच्या कुत्र्यालाही झाला Coronavirus)
दरम्यान, चीनमधील वुहान येथून पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे जगातील 70 हून अधिक देश प्रभावित झाले आहेत. आतापर्यंत जगभरात कोरोनामुळे सुमारे 3100 लोक मरण पावले आहेत आणि 90 हजार लोकांत कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. त्याचबरोबर भारतात आतापर्यंत कोरोना विषाणूची 29 पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली आहेत.