Mumbai Police | (Photo Credits: ANI)

मुंबईतील एका मॉडेलने (Mumbai Model) तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केल्यानंतर रांची येथील रहिवाशावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तनवीर अख्तर मोहम्मद लेक खान (Tanveer Akhtar Mohd Lake Khan) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या रहिाशाचे नाव असल्याचे मुंबई (Mumbai Police) पोलिसांनी म्हटले आहे. मुंबई तील वर्सोवा पोलीस स्टेशन दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय दंड संहिता कलम 376(2)(N), 328,506,504,323 आणि आयटी कायद्याच्या कलम 67 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, हे प्रकरण रांची पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. पीडितेने मुंबई पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ती मूळची बिहारमधील भागलपूरची रहिवासी आहे आणि मॉडेलिंग वर्कशॉपच्या संदर्भात रांची येथे आली होती तेव्हा ती आरोपीच्या संपर्कात आली होती, ज्याने 2021 पासून तिच्यावर वारंवार बलात्कार केला आणि तिला धमकावले आणि ब्लॅकमेल केले.

पोलिसांनी सांगितले की, हे प्रकरण रांची पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. पीडितेने मुंबई पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ती मूळची बिहारमधील भागलपूरची रहिवासी आहे आणि मॉडेलिंग वर्कशॉपच्या संदर्भात रांची येथे आली होती तेव्हा ती आरोपीच्या संपर्कात आली होती, ज्याने 2021 पासून तिच्यावर वारंवार बलात्कार केला आणि तिला धमकावले आणि ब्लॅकमेल केले. आरोपीने तिला घडल्या प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिली होती. या महिलेने सांगितले की तिला तिचे मॉडेलिंग करिअर करण्यासाठी मुंबईला जायचे होते. परंतु त्याने मला "धर्म बदलण्यास सांगणे" आणि त्याच्याशी लग्न करण्यास सांगितले. तिने नाव बदलण्यासाठी दबाव आणल्याचेही तिने सांगितले.

ट्विट

महिलेने सांगितले की, आरोपीने तिच्यावर शूटिंगसाठी बँकॉकला येण्यासाठी दबाव आणला आणि तिने नकार दिल्यावर काही फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडितेने पुढे सांगितले की, त्याने तिच्या भावाला आणि आईला काही आक्षेपार्ह फोटो पाठवले आणि तिने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. परंतु ओळखीच्या व्यक्तीने असे करण्याच्या विचारापासून तिला परावृत्त केले. पीडितेने सांगितले की, तिने अनिच्छेने बँकॉकला जाण्यास सहमती दर्शवली जिथे आरोपीने पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. ती नंतर मुंबईत आली पण आरोपी तिचा छळ करत होता, असेही तिने म्हटले आहे.

पीडितेने सांगितले की, तिने यापूर्वी पोलिसांत तक्रार दाखल केली होती, परंतु आरोपीने तिला त्रास देणार नाही असे शपथपत्र दिले आणि तक्रार परत घेण्याची विनंती केली. पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, तिने आरोपीच्या मागण्या मान्य करण्यास नकार दिल्यानंतर त्याने तिच्या नावाने बनावट आयडी बनवले आणि तिला त्रास देण्यासाठी आक्षेपार्ह फोटो पोस्ट केले आणि आक्षेपार्ह संदेश पाठवले. पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, आरोपीने तिला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.