मुंबई: गोरेगाव येथे गटारात पडलेल्या 3 वर्षीय दिव्यांश सिंह याचा शोध 30 तासांनंतरही सुरुच
Divyansh Singh & Fire Brigade Jawan (Photo Credits: ANI)

मुंबईतील गोरेगाव येथील आंबेडकर नगर भागात उघड्या गटारात पडलेल्या दिव्यांश सिंह (Divyansh Singh) या 3 वर्षीय चिमुरड्याचा शोध अद्याप सुरुच आहे. या घटनेला 30 तास ओलांडून गेले असूनही अद्याप या चिमुरड्याचा पत्ता लागलेला नाही. मुंबई पोलिस आणि अग्निशामक दलाचे जवान यांनी युद्धपातळीवर शोधमोहिम हाती घेतली आहे. (उघड्या गटारांची माहिती देण्यासाठी मुंबई महापालिकेने जाहीर केला नंबर)

ANI ट्विट:

10 जुलै, बुधवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास दिव्यांश घरासमोरील उघड्या गटारात पडला. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दिव्यांश गटारात पडल्याचे उघडकीस आले. त्यानंतर संतप्त झालेल्या स्थानिकांनी पालिकेविरोधात रास्तारोको देखील केले. तर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी कुटुंबियांची भेट घेत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

ANI ट्विट:

दरवर्षीच्या पावसात पालिकेचा बेजबाबदारपणा उघड करणारी एखादी तरी घटना समोर येते. काही दिवसांपूर्वी मीरा देसाई रोडवरील उघड्या गटारात एक तरुण पडला होता. मात्र स्वतःचे प्राण वाचवण्यात त्याला यश आले. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचतं आणि त्यामुळे खड्डे, उघडी गटारे यांचा अंदाज येत नाही. परिणामी नागरिकांचा नाहक बळी जातो.