उघड्या गटारांची माहिती देण्यासाठी मुंबई महापालिकेने जाहीर केला नंबर
मुंबई महानगरपालिका (Photo Credits: Facebook)

गोरेगाव (Goregaon) येथे 3 वर्षाच्या चिमुरडा नाल्यात पडल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आता मुंबई (Mumbai) महापालिकेने (BMC) यावर उत्तर देत नागरिकांवर त्याचे खापर फोडले आहे. परंतु आता महापालिकेने त्यांच्या ट्वीटरवरुन उघड्या गटारांची माहिती देण्यासाठी एक नंबर जाहीर केला आहे. त्यावरुन आता नागरिकांना त्या नंबरवरुन याबद्दल माहिती देण्याची सेवा पुरवली जाणार आहे.

दिव्यांश हा अद्याप मिळाला नसून त्याचे शोधकार्य अद्याप सुरु आहे. त्यानंतर स्थानिकांना विनंती करत महापालिकेने अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नये म्हणून तात्काळ माहिती वॉर्ड कंट्रोल रुमला 1916 हा हेल्पलाईन क्रमांकावर फोन करुन माहिती देण्याचे आवाहन केले आहे. मात्र या ट्वीटनंतर नेटकऱ्यांनी आपला असंतोष व्यक्त केला आहे.

(हेही वाचा-गोरेगाव: मुलगा वाहून गेल्याच्या घटनास्थळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची धाव, लगावला मुंबईकरांवरच गटारांची झाकणे उघडी ठेवण्याचा आरोप)

तर गोरेगावच्या घटनेचे खापर महापालिकेच्या महापौरांनी 'सिव्हिक सेन्स' वर फोडले आहे. त्याचसोबत दिव्यांशच्या आईने त्याची काळजी घ्यायला हवी होती. तसेच गटाराच झाकट का उघडे ठेवले होते की झाकट नागरिकांनी तोडले होते याची चौकशी करावी असे आदेश महाडेश्वर यांनी दिले आहेत.