Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Mumbai News: बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) वरिष्ठ परवाना निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या ५५ ​​वर्षीय व्यक्तीचा विक्रोळीजवळील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) पुलावर अपघात झाला. या घटनेत त्यांचाय अपघाती मृत्यू झाला. महेशचंद्र पगारे असे मृत व्यक्तीचे नाव असून, तो बीएमसीच्या सांताक्रूझ कार्यालयात कामाला होता आणि दररोज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कामावर निघून गेला. त्याची पत्नी स्वाती (५२) हिच्या तक्रारानुसार शनिवारी, घटनेच्या दिवशी ते नेहमीप्रमाणे कामावर निघाले होते.

पगारे हे सांताक्रूझला जाण्यासाठी ठाण्याच्या माजिवडा येथील बाळकुम पाडा येथून ऑटोरिक्षा घेत होते. त्यावेळी ही घटना घडली. मृत व्यक्तीच्या पत्नी स्वाती यांच्या तक्रारीनुसार,शुक्रवारी संध्यारीळी तीने पतीला परतीच्या वेळीस अनेक वेळा फोन केला. पंरतु त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. काही वेळा नंतर एका पोलिसांनी त्यांना फोन करून माहिती दिली.

पोलीस कर्मचाऱ्याने माहिती दिली की पगारे यांचा जेव्हीएलआर पुलावर अपघात झाला आणि त्यांना उपचारासाठी मुलुंड येथील सावरकर रुग्णालयात नेण्यात आले. स्वाती हॉस्पिटलमध्ये पोहोचली तेव्हा त्याची पतीची प्रकृती चिंताजनक होती, त्याच्या डोक्याला खूप रक्तस्त्राव आणि जखमा होत्या. प्रचंड रक्तस्राव झाल्याने पगारे यांना शर्थीचे प्रयत्न करूनही वाचवता आले नाही. सायंकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी त्यांना हॉस्पिटल प्रशासनाने मृत घोषित केले.