
Mumbai News: मुंबईत BComचा पेपर फोडल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी कोंचिंग क्लासमधील संचालकाला ताब्यात घेतलं आहे. बीकॉमचा (Bcom) पाचव्या सेमिस्टरचा पेपर फोडल्यामुळे या प्रकरणात शनिवारी पोलिसांकडून कारवाई केले आहे. राजेश शर्मा असं अटक (Arrest) करण्यात आलेल्या संचालकाचे नाव आहे, तो गोरेगाव मध्ये कोचिंग क्लास चालवतो अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली. (हेही वाचा- बुलढाण्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटला; सोशल मीडियावर व्हायरल होतोय फोटो)
मिळालेल्या माहितीनुसार, रजनीकांत गजानन मौर्य याची चौकशी सुरु असताना त्याला राजेश शर्मा यांनीच ही एक प्रत पाठवली होती.पेपर फुटी प्रकरण 31 ऑक्टोबर 2023 रोजी घडली. तर 2 नोव्हेंबरला पोलिंसांनी या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आतापर्यंच 2 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थ्यांवर पाचव्य सेमिस्टरमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
बीकॉमच्या पाचव्या सेमिस्टरचा पेपर सुरु होता तेव्हा परिक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून तैनात असलेल्या व्यक्तीला एक विद्यार्थ्याला कॉपी करत असल्याचा संशय आला.त्यामुळे त्यांनी मुलाची तपासणी करण्यास सांगितली. त्याच्याकडे मोबाईल फोन असल्याचे आढळून आळं. फोनमध्ये प्रश्नपत्रीकेचा फोटो असल्याचे दिसले. त्यामुळे परिक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. पर्यवेक्षकांनी फोन जप्त करून मुंबई विद्यापीठाच्या उच्च अधिकाऱ्यांना माहिती दिली. तपासात मौर्य यांच नाव समोर आलं त्यानंतर कोचिंग क्लासचे संचालय राजेश शर्मा यांना देखील ताब्यात घेतलं.