मुंबई (Mumbai) मध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्याने (Southwest Monsoon) येणाऱ्या पावसाचे आगमन जूनच्या दुसऱ्या आठवड्यात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागाचे मुख्य अधिकारी राजेंद्र कुमार जेनमणी यांनी ANI ला दिलेल्या माहितीनुसार, केरळ मध्ये 1 ते 5 जून च्या दरम्यान नैऋत्य मोसमी मान्सुन दाखल होईल आणि त्यांनंतर दहा दिवसांनी म्हणजेच 15 ते 20 जून च्या दरम्यान मुंबई मध्ये मान्सून (Mumbai Monsoon) चे आगमन होणार आहे. तर उत्तर भारतात 29 मे पासून वादळी वार्यासह पाऊस सुरू होईल आणि तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. असेही जेनमणी यांनी सांगितले आहे. यापूर्वीच हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा भारतात सरासरीच्या शंभर टक्के पाऊस होणार आहे.
महाराष्ट्रात अनेक भागात सध्या उष्णतेचा पारा वाढलेला दिसून येत आहे, शनिवारी नागपूर मध्ये सर्वाधिक म्हणजेच 46 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. यापाठोपाठ अकोला व विदर्भातील अन्यही भागात 40 अंशाहून अधिक तापमान नोंदवले गेले होते. यानुसार सध्या विदर्भ भागाला हिट अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
ANI ट्विट
Southwest monsoon is expected to arrive over Kerala coast between June 1 & June 5 & is likely to reach Mumbai between June 15 & June 20: Rajendra Kumar Jenamani, head of Regional Specialised Meteorological Centre pic.twitter.com/NGMvaDEFI0
— ANI (@ANI) May 25, 2020
दरम्यान, मुंबईमध्ये सध्या कोरोनाचे संकट असताना पाऊस सुरु झाल्यास परिस्थिती आणखीन बिघडण्याची शक्यता आहे असे मत काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले होते. कोरोनासोबतच मान्सून काळात मलेरिया- डेंगू यांसारखे आजार पसरण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही मात्र यानुसार योग्य ती खबरदारी घेऊन महापालिका सक्षम पाऊले उचलेल असा विश्वास सुद्धा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता.