Mumbai: फी कमी करण्याचे आश्वासन देत व्यक्तीने विद्यार्थ्याला लावला 2 कोटी रुपयांचा चुना
Arrested | Representational Image | (Photo Credits: Facebook)

Mumbai: मुंबई पोलिसांनी एका 43 वर्षीय व्यक्तीला मिरा रोड येथून अटक केली आहे. सदर आरोपीने एक बनावट शिक्षण संस्था सुरु करत विद्यार्थ्यांच्या पालकांना गरिबांसाठी शासनाच्या योजनेअंतर्गत 50 टक्के फी वर सूट देत असल्याचे सांगत 2 कोटी रुपयांची फसवणूक केली. पायधोनी आणि कश्मीरा पोलिसांनी कइद जोहर अली याच्या विरोधात फसवणूकीच्या कलमांसह अन्य कायद्यानुसार कारवाई केली आहे.(Mumbai Colleges Reopen: मुंबईतील महाविद्यालये आजपासून होणार सुरु, विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असण्याची शक्यता)

प्राइड ग्रुप नावाच्या संस्थेबद्दल जेव्हा पालकांनी तक्रार केली तेव्हा हे प्रकरण समोर आले. पोलिसांच्या मते, ऑक्टोंबर 2019 ते एप्रिल 2021 दरम्यान काइद याने काही बनवाट संस्था उभारल्या, त्याच्या माध्यमातून एकूण 7495 विद्यार्थ्यांच्या पालकांकडून 1.94 कोटी रुपये उकळले.(Maharashtra Student Protest: दहावी आणि बारावीच्या ऑनलाइन परीक्षांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे राज्यभर आंदोलन, विद्यार्थाच्या आंदोलनामागे हिंदुस्थानी भाऊ?)

पोलिसांनी असे म्हटले की, प्रत्येक पालकांनी आरोपीला 2500 रुपये देण्यासह त्यांचे आधार कार्ड, फोटो आणि अन्य कागदपत्र त्या योजनेसाठी लागणार असल्याचे सांगितले.पालकांचा विश्वास जिंकण्यासाठी त्याने काही विद्यार्थ्यांची फी सुद्धा भरल्याचे सांगितले. पण जेव्हा त्याने आणखी विद्यार्थ्यांना यामध्ये भुलवले आणि त्यांचे पैसे घेऊन पळाला. काइद याला अटक केली असून अद्याप त्याच्याकडील रक्कम जप्त करण्यात आलेली नाही. आरोपीचे बँक खाते फ्रीज करावे अशी विनंती केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.