Mumbai Colleges Reopen: मुंबईतील महाविद्यालये आजपासून होणार सुरु, विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असण्याची शक्यता
Representational Image (Photo Credits: PTI)

Mumbai Colleges Reopen: मुंबईतील महाविद्यालये महिनाभर बंद राहिल्यानंतर आजपासुन ती पुन्हा सुरु होणार आहेत. तर ऑफलाइन पद्धतीने आता विद्यार्थ्यांना शिकवले जाणार असून विद्यार्थ्यांना उपस्थिती लावावी लागणार आहे. पूर्णपणे लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. परंतु मुख्याध्यापकांनी या कारणामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे.विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शिकण्यासाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ सुद्धा उपलब्ध करुन दिले आहेत. जेणेकरुन महाविद्यालयात येण्याऐवजी त्यांना घरुनच लेक्चरला बसता येईल. कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाविद्यालयाचा परिसर जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच बंद करण्यात आला होता.

अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांनी तरी ऑफलाइन पद्धतीच्या वर्गासाठी उपस्थितीत लावावी अशी अपेक्षा केली जात आहे. परंतु पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी उपस्थिती कमी असू शकते. जर त्यांना वेळ वाचवण्यासह पैसे सुद्धा खर्च करायचे नसतील तर ते महाविद्यालयात येणारच नाही. बहुतांश विद्यार्थी हे मुंबई बाहेरील आहेत. त्यामुळे ते लवकर महाविद्यालयात येतील असे वाटत नाही असे सेंट्रस मुंबईतील एका शिक्षकांनी म्हटले आहे. (Maharashtra School Reopen: पुण्यातील 1-10 चे वर्ग आजपासून पुन्हा सुरु होणार)

सायन्स विभागातील विद्यार्थ्यांनी आम्ही प्रॅक्टिल्ससाठी महाविद्यालयात येऊ. पण लेक्चरसाठी नियमितपणे येणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मिठीबाई आणि एन एम महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे यांनी असे म्हटले की, त्यांच्याकडे 40 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी हे मुंबईसह महाराष्ट्राच्या बाहेरील आहेत. काहींनी हॉस्टेल बद्दल ही विचारले आहे. परंतु राज्यातील हॉस्टेल सुरु करण्यासंदर्भात अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना आपण राहणार कुठे असा प्रश्न सतावत आहे. परंतु पहिल्या आणि दुसऱ्या वर्षातील विद्यार्थी हे ऑफलाइन पद्धतीने वर्गात शिकत आहेत.