'भारतीय रेल्वे'चं महिला प्रवाशांसाठी खास गिफ्ट; आता सुंदर पेंटिंग असलेल्या डब्यातून करा प्रवास (पहा व्हिडिओ)
Mumbai Local Women Coach (Photo Credits: Twitter)

मुंबई लोकल मुंबईकरांची लाईफलाईन आहे. मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवात आणि शेवटीही ट्रेनच्या प्रवासानेच होतो. त्यामुळे आपला हा दैनंदिन प्रवास सुंदर करण्यासाठी भारतीय रेल्वेने एक खास पाऊल उचलले आहे. आता मुंबई उपनगरात धावणाऱ्या रेल्वे लोकलच्या महिला डब्ब्यांमध्ये विविध प्रकारचे मनमोहक पेंटिंग्स असणार आहेत. (मुंबई लोकलच्या महिला कोच चा बदलणार लोगो, 'डोक्यावर पदर घेतलेल्या महिलेची' जागा घेणार आता 'ब्लेझर घातलेली महिला')

लोकल ट्रेन्सचे इंटीरिअर बदलले

लोकल ट्रेन्सचे महिला डब्ब्यांचे इंटीरिअर खास करण्यात आले आहे. महिलांचे डब्बे विविध पेंटिंग्सने सजवले जातील.समुद्रात तरंगणारे मासे, फुलं, फुलपाखरं अशा विविध चित्रांनी डब्बे सजवण्यात आले आहेत. महिला डब्याबाहेर साडीत महिलेऐवजी आधुनिक महिलेचे चित्र असणारा आहे. तर डब्याच्या आतील बदल देखील महिलांच्या पसंतीस पडत आहे.

पहा व्हिडिओ:

 

रेल्वे प्रशासनाने उचललेल्या या पावलामुळे महिलांचा प्रवास सुंदर, प्रसन्न होण्यास नक्कीच मदत होईल, अशी आशा आहे.