Mumbai Local | (Photo Credit - Twitter)

मुंबई लोकल (Mumbai Local) ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. दिवसागणिक वाढती प्रवाशीसंख्या पाहता पश्चिम रेल्वेकडून (Western Rail Line) 5 एप्रिलपासून 11 नॉन एसी लोकल्स (Non AC Local) वाढवण्यात आल्या आहे. या सार्‍या लोकल 12 डब्ब्याच्या आहेत. या नव्या लोकल मध्ये अप दिशेकडे 5 गाड्या असतील तर डाऊन मार्गावर 6 लोकल फेर्‍या वाढवण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी 12 डब्ब्याच्या लोकलचे 15 डब्ब्याच्या लोकल मध्ये रूपांतर देखील करण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वे कडून 15 डब्ब्याच्या एकूण 150 फेर्‍या आहेत. 12 डब्ब्याच्या आता 11 अजून लोकल फेर्‍या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर लोकलच्या एकूण फेर्‍या1383 वरून 1394 झाली आहे. अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी 3 फास्ट लोकल आहेत. या फास्ट लोकल बोरिवली आणि वांद्रे मध्ये थांबणार नाहीत.

अप मार्गावरील वाढीव फेऱ्या

सकाळी ९.४० गोरेगाव – चर्चगेट (स्लो)

सकाळी १०.४२ विरार- दादर (फास्ट)

सकाळी ११.५० गोरेगाव- चर्चगेट (स्लो)

दुपारी १.५३ विरार-अंधेरी (फास्ट)

दुपारी २.४७ विरार-बोरिवली (फास्ट)

डाऊन मार्गावरील वाढीव फेऱ्या

सकाळी ८.३८ चर्चगेट- गोरेगाव (स्लो)

सकाळी १०.५१ चर्चगेट- गोरेगाव (स्लो)

दुपारी १२.०६ दादर- विरार (फास्ट)

दुपारी २.०० अंधेरी- विरार (फास्ट)

दुपारी ३.२३ बोरिवली-विरार (फास्ट)

रात्री ९.५५ चर्चगेट- वांद्रे (स्लो)

पश्‍चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी, सुमित ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "12 कारच्या सहा सेवेचे 15 कार सेवेत वाढ करण्यामुळे 25% प्रवासी क्षमता वाढणार आहे. यामुळे 79 एसी लोकल सेवांसह 1383 सेवांमध्ये कोणताही बदल होणार नाही. या वाढीमुळे प्रवाशांना त्यांच्या सोयीसाठी अतिरिक्त निवास उपलब्ध होईल".