Mumbai Local Train Update: मुंबई लोकलने सर्वसामान्यांच्या प्रवाशांबद्दल पुढील आठवड्यात निर्णय घेतला जाणार- किशोरी पेडणेकर
Mayor Kishori Pednekar (Photo Credits-ANI)

Mumbai Local Train Update:  मुंबईच्या लोकल ट्रेनने सर्वसामान्यांना प्रवास करण्यास मुभा देण्यासंदर्भात पुढील आठवड्यात निर्णय घेतला जाईल असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. तसेच हा निर्णय शहरातील कोरोनाच्या परिस्थितीवर सुद्धा अवलंबून असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले. मीडियाशी बोलताना पेडणेकर यांनी असे म्हटले की, सध्या फक्त अत्यावश्यक सेवासुविधांमधील नागरिकांना लोकलने प्रवास करण्यास परवानगी आहे.(मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह महाराष्ट्र सरकारचं शिष्टमंडळ उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला जाणार; राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली माहिती)

आजपासून पाच टप्प्यातील अनलॉकला सुरुवात झाली आहे.आता फक्त अत्यावश्यक सेवासुविधांमधील कर्मचारी लोकलने प्रवास करत आहेत. मात्र सर्वसामान्यांना यामधून प्रवास करण्यास मिळणार का यावर पुढील आठवड्यात निर्णय होणार असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. कोरोनाची दुसरी लाट अद्याप कायम असली तरीही राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकिंग करण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने ऑक्सिजन बेडची उपलब्धता आणि पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी पाहता पाच टप्प्यात अनलॉकिंगची घोषणा केली आहे.

मुंबईत रेस्टॉरंट्स, विनाअत्यावश्यक सेवेतील दुकाने आणि सार्वजनिक ठिकाणे आजपासून सुरु झाली आहेत. पण मॉल्स, थिएटर्स आणि मल्टीप्लेक्स अद्याप बंदच राहणार आहेत. रेस्टॉरंटमध्ये 50 टक्के क्षमतेसह दुपारी 4 वाजेपर्यंत बसून खाण्यासह परवानगी दिली गेली आहे.(मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बालरोग तज्ज्ञांचा मुलांमधील कोविड संसर्गासंदर्भात आशासेविकांशी संवाद साधणार)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी असे म्हटले की, स्थानिक प्रशानावर त्यांच्या ठिकाणी अनलॉकिंग बद्दल निर्णय घेण्याची जबाबदारी असणार आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होत चालला आहे. फक्त 12,557 रुग्ण आढळल्याची माहिती दिली आहे. तसेच 14,445 जणांना डिस्चार्ज दिला आहे. राज्यातील रिकव्हरी रेट 95.05 टक्के रविवारपर्यंत पोहचला आहे.