
Mumbai Local Train News: पश्चिम रेल्वेने (Western Railway Updates) माहीम आणि बांद्रा स्टेशनदरम्यान असलेल्या Bridge No. 20 वर रिगर्डरिंगच्या (Mahim Bandra Bridge Work) कामासाठी 11, 12 आणि 13 एप्रिल 2025 रोजी जंबो ब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे या तीन दिवसांत 334 उपनगरीय ट्रेन सेवा रद्द (Mumbai Train Cancellations) होणार असून, मुंबई उपनगरीय नेटवर्कवरील (Suburban Train News) हजारो दैनंदिन प्रवाशांवर याचा परिणाम होणार आहे. प्रामुख्याने हे ब्लॉक रात्रकालीन असतील. त्यामुळे दिवसा प्रवासावर विशेष मर्यादा पडणार नसल्या तरीसुद्धा दिवसा होणारी वाहतूक प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात मुंबई शहरात कोठेही प्रवास करण्यापूर्वी ब्लॉकचे हे वेळापत्रक जरुर जाणून घ्या.
हा ब्लॉक अप आणि डाउन स्लो आणि फास्ट लाइन्सवर रात्रीच्या वेळी होणार आहे. ब्लॉकच्या वेळांचे पूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
11/12 एप्रिल (शुक्रवार/शनिवार):
11:00 PM ते 08:30 AM – अप आणि डाउन स्लो लाइन्स
12:30 AM ते 06:30 AM – डाउन फास्ट लाइन
12/13 एप्रिल (शनिवार/रविवार):
11:30 PM ते 09:00 AM – अप आणि डाउन स्लो आणि डाउन फास्ट लाइन्स
11:30 PM ते 08:00 AM – अप फास्ट लाइन
11–12 एप्रिल (शुक्रवार/शनिवार) रोजी उपनगरीय ट्रेन सेवांवरील परिणाम:
चर्चगेटवरून 10:23 PM ते 11:58 PM दरम्यान सुटणाऱ्या सर्व स्लो ट्रेन मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझ दरम्यान फास्ट लाइनवर धावतील. या ट्रेन महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहीम आणि खार रोड येथे थांबणार नाहीत.
त्याचप्रमाणे, विरार, भाईंदर आणि बोरीवलीहून सुटणाऱ्या स्लो सेवा देखील फास्ट लाइन्सवर धावतील आणि वरील स्टेशनांवर थांबणार नाहीत.
चर्चगेटवरून शेवटची स्लो ट्रेन 10:23 PM ला भाईंदरसाठी सुटेल, तर शेवटची फास्ट सेवा 11:40 PM ला विरारसाठी सुटेल.
11:58 PM ची चर्चगेट-विरार लोकल देखील फास्ट लाइन्सवर धावेल आणि मधली स्टॉप्स वगळेल.
बोरीवली-चर्चगेट शेवटची स्लो सेवा 10:15 PM ला आणि विरार-चर्चगेट शेवटची ट्रेन 12:05 AM ला आहे.
ब्लॉक कालावधीत विशेष संचालन:
चर्चगेट ते दादर ट्रेन फास्ट लाइन्सवर धावतील.
गोरेगाव ते बांद्रा ट्रेन हार्बर लाइनवर चालतील.
विरार ते अंधेरी सेवा स्लो आणि फास्ट दोन्ही लाइन्सवर धावतील.
शनिवारी (12 एप्रिल) पहिल्या लोकल ट्रेन सेवा:
विरार ते चर्चगेट: 5:47 AM
भाईंदर ते चर्चगेट (फास्ट लाइनवरून): 6:10 AM
बोरीवली ते चर्चगेट (स्लो): 8:03 AM
चर्चगेट ते बोरीवली (फास्ट): 6:14 AM
चर्चगेट ते विरार (फास्ट): 6:15 AM
चर्चगेट ते बोरीवली (स्लो): 8:03 AM
12–13 एप्रिल (शनिवार/रविवार) रोजी उपनगरीय ट्रेन सेवांवरील परिणाम:
चर्चगेट-दादर ट्रेन फास्ट लाइन्सवर धावतील.
दहाणू रोड, विरार, नालासोपारा, वसई रोड, भाईंदर आणि बोरीवलीहून येणाऱ्या सर्व अप सेवा अंधेरी येथे संपतील.
गोरेगाव-बांद्रा/माहीम ट्रेन हार्बर लाइनवर धावतील.
चर्चगेट-विरार शेवटच्या स्लो आणि फास्ट ट्रेन अनुक्रमे 10:53 PM आणि 11:05 PM ला सुटतील.
शेवटची माहीम-गोरेगाव सेवा: 12:11 AM
शेवटची बांद्रा-विरार ट्रेन: 1:30 AM
शेवटची बोरीवली-चर्चगेट स्लो ट्रेन: 10:49 PM
शेवटची विरार-चर्चगेट फास्ट ट्रेन: 10:24 PM
शेवटची विरार-बांद्रा लोकल: 12:05 AM
रविवारी (13 एप्रिल) पहिल्या सेवा:
विरार-चर्चगेट (स्लो): 8:08 AM
भाईंदर-चर्चगेट (एसी लोकल): 8:24 AM
वसई रोड-चर्चगेट (स्लो, अंधेरीपर्यंत): 8:14 AM
विरार-चर्चगेट (फास्ट): 8:18 AM
चर्चगेट-विरार (फास्ट): 9:03 AM
चर्चगेट-बोरीवली (स्लो): 9:04 AM
मेल/एक्सप्रेस ट्रेनवर परिणाम:
लहान मार्गावर संपणाऱ्या / सुरू होणाऱ्या ट्रेन:
09052 भुसावळ-दादर स्पेशल (12 एप्रिल) – बोरीवली येथे संपेल
12927 दादर-एकता नगर SF एक्सप्रेस (12 एप्रिल) – बोरीवलीहून सुरू होईल
19003 दादर-भुसावळ खानदेश एक्सप्रेस (13 एप्रिल) – बोरीवलीहून सुरू होईल
19015 दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेस (13 एप्रिल) – बोरीवलीहून सुरू होईल
22946 ओखा-मुंबई सेंट्रल सौराष्ट्र मेल (12 एप्रिल) – बोरीवली येथे संपेल
12902 अहमदाबाद-दादर गुजरात मेल (12 एप्रिल) – पालघर येथे संपेल
59024 वलसाड-मुंबई सेंट्रल पॅसेंजर (13 एप्रिल) – बोरीवली येथे संपेल
59045 मुंबई सेंट्रल-वापी पॅसेंजर (13 एप्रिल) – बोरीवलीहून सुरू होईल
19016 पोरबंदर-दादर सौराष्ट्र एक्सप्रेस (11 एप्रिल) – बोरीवली येथे संपेल
20901 मुंबई-गांधीनगर वंदे भारत:
12 एप्रिल: 6:15 AM ला सुटेल
13 एप्रिल: 8:50 AM ला सुटेल
12009 मुंबई-अहमदाबाद शताब्दी:
12 एप्रिल: 6:30 AM ला सुटेल
22953 मुंबई-अहमदाबाद गुजरात SF:
12 एप्रिल: 6:40 AM ला सुटेल
13 एप्रिल: 9:00 AM ला सुटेल
12928 एकता नगर-दादर एक्सप्रेस:
12 एप्रिल: 11:25 PM ला सुटेल
14707 लालगढ-दादर राणकपूर एक्सप्रेस:
12 एप्रिल: 9:25 AM ला सुटेल
12962 इंदूर-मुंबई अवंतिका एक्सप्रेस:
12 एप्रिल: 7:40 PM ला सुटेल
12956 जयपूर-मुंबई सेंट्रल SF एक्सप्रेस:
12 एप्रिल: 4:30 PM ला सुटेल
12268 हापा-मुंबई दुरंतो एक्सप्रेस:
12 एप्रिल: 1 तास 30 मिनिटे उशीर
12952 नवी दिल्ली-मुंबई सेंट्रल राजधानी:
12 एप्रिल: 50 मिनिटे उशीर
प्रवाशांना त्यांचा प्रवास योग्यरित्या नियोजित करण्याचा आणि या मोठ्या ब्लॉकदरम्यान गैरसोयी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या अधिकृत माध्यमांद्वारे अपडेट राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.