रविवार म्हणजे मेगाब्लॉकचा (Megablock) दिवस मुंबईकरांसाठी काही नवीन राहिलेले नाही. आजही मुंबई लोकल चा हार्बर (Harbour) आणि पश्चिम रेल्वे (Western Railway) मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. मात्र मध्य रेल्वेच्या (Central Railway) प्रवाशांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे आजच्या मेगाब्लॉकपासून त्यांची सुटका झाली आहे. शुक्रवार आणि शनिवार म्हणजेच 13 व 14 मार्च रोजी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात आला होता ज्यामुळे उद्या म्हणजेच रविवारी मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावर ब्लॉकला सुट्टी देण्यात आली आहे.
तर दुसरीकडे कुर्ला (Kurla) ते वाशी (Vashi) आणि सांताक्रूझ (Santacruz) ते गोरेगाव (Goregaon) दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी काही लोकल फेऱ्या रद्द तर काही उशिराने धावणार आहेत. Mumbai Local Megablock 15th March: हार्बर आणि पश्चिम रेल्वे वर उद्या मेगाब्लॉक; मध्ये रेल्वे प्रवाशांना दिलासा
जाणून घ्या कसे असेल आजचे रेल्वेचे वेळापत्रक
पश्चिम रेल्वे
सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 या वेळेत अप आणि डाऊन धीमा मार्गावर ब्लॉक घेणार आहे. ब्लॉकवेळेत डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून चालवण्यात येतील. या लोकलला विलेपार्ले स्थानकात दोन वेळा थांबा देण्यात येईल. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून, काही विलंबाने धावणार आहेत.
हार्बर रेल्वे
कुर्ला ते वाशी या स्थानकांच्या दरम्यान सकाळी 11.40 ते दुपारी 4.10 मध्ये अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. ब्लॉकच्या कालावधीत सीएसएमटी ते वाशी/नेरुळ/पनवेल मार्गावरील अप आणि डाऊन लोकल फेऱ्या बंद राहणार आहेत. यादरम्यान सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी-पनवेल मार्गावर विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
तसेच मध्य रेल्वेला या मेगाब्लॉक पासून आज विश्रांती मिळाल्याने मध्य रेल्वेचे प्रवासी आज निर्धास्तपणे आपला प्रवास आखू शकतात. मात्र कोरोना व्हायरसचे सावट लक्षात घेता योग्य ती काळजी असेही रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.