विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामामुळे उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक (Mega Block) घेतला जाणार असल्याची माहिती मध्य(Central Railway),पश्चिम (Western Railway) आणि हार्बर रेल्वेच्या (Harbour Railway) वतीनं देण्यात आली आहे. आज धावणाऱ्या लोकलची संख्या काही प्रमाणात कमी असणार आहे. प्रत्येक रविवारीचं लोकल रेल्वेकडून हा मेगाब्लॉक घेण्यात येतो पण आज मुंबईतील कुठल्या एका लाईनवर नाही तर सलग चारही लाइनवर मेगाब्लॉक असल्याने रेल्वे कडून विशेष वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. तरी जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार प्रवाशांनी प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेसह हार्बर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सीएसएमटी (CSMT) ते कल्याण (Kalyan) या मुख्य मार्गावर मेगाब्लॉक (Mega Block) टाकण्यात आलेला नाही. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-चुनाभट्टी (Chunabhatti), वांद्रे (Bandra) दरम्यानच्या दोन्ही मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या वेळेत ठाणे (Thane)-वाशी(Vashi), नेरुळ अप-डाऊन (Nerul Up Down) येथेही मेगाब्लॉक राहणार आहे. तर पनवेल (Panvel) ते कुर्ला (Kurla) (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान 20 मिनिटांच्या अंतराने विशेष सेवा चालवल्या जातील. सीएसएमटी/वडाळा (Vadala Road) रोडवरून वाशी/बेलापूर (Belapur)/पनवेलसाठी सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत आणि वांद्रे/गोरेगाव (Goregaon) येथून सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत सुटणारी हार्बर (Harbour Line) मार्गावरील सेवा बंद राहतील. (हे ही वाचा:- Mumbai: देव तारी त्यास कोण मारी! 20 व्या मजल्यावरून खाली पडूनही महिला जिवंत, जाणून घ्या सविस्तर)
पनवेल/बेलापूर/वाशीहून सीएसएमटीसाठी सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीसाठी सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 या वेळेत अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद असेल. तर पश्चिम रेल्वेच्या बोरिवली (Borivali) ते गोरेगाव दरम्यान दोन्ही धीम्या मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. ब्लॉक दरम्यान या दोन स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर धावतील. तर काही लोकल गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत.