मुंबईच्या लाईफलाईनसाठी दर रविवारी देखभालीची कामं करण्यासाठी मेगाब्लॉक (Megablock) जाहीर केला जातो. या रविवारी 17 जुलै दिवशी ठाणे- कल्याण, सीएसएमटी-चुनाभट्टी आणि चर्चगेट-मुंबई सेंट्रल या स्थानका दरम्यान मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकच्या काळात काही फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही लोकल विलंबाने धावणार आहेत.
मध्य रेल्वेच्या मेन लाईन वर ठाणे -कल्याण दरम्यान अप आणि डाऊन दरम्यान 10.40 ते 3.40 मध्ये ब्लॉक असेल. या काळात जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावरून चालविण्यात येतील.तर या काळात लोकल 15-20 मिनिटं उशिराने धावणार आहे.
हार्बर मार्गावर 11.40 ते 4.40 या वेळेत अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वांद्रे/गोरेगाव करीता सुटणाऱ्या अप-डाऊन लोकल फेऱ्या बंद असतील.
वेस्टर्न लाईन वर देखील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान 11.40 ते 4.40 दरम्यान धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द असतील.