Mumbai Local Train: शंभरपेक्षा जास्त लोकल रद्द झाल्याने मुंबईकरांचे हाल, जाणून घ्या कारण
Mumbai Local Train | (File Image)

मुंबईत मध्य रेल्वेच्या (Mumbai Central Railway) वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. शुक्रवारी एक्स्प्रेसच्या धडकेत एका मोटरमनचा मृत्यू (Moterman Death) झाला होता. मात्र ती आत्महत्या असल्याचा दावा मोटमनच्या संघटनांनी केला आहे. शनिवारी मृत्यू झालेल्या मोटरमनच्या अंत्यविधीला जाण्यासाठी आणि अतिरिक्त काम करण्यास नकार दिल्याने मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे शंभरपेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द (Railway System Collapsed) झालेल्या आहे. त्यामुळे शनिवारी मुंबईकरांचे मोठे हाल झाले आहे. ( Rail Accident Viral Video: ट्रेन खाली आला प्रवासी प्लॅटफॉर्मवरील गर्दीने ट्रेनला धक्का मारत केली मदत; वाशी स्थानकातील घटना ( Watch Video))

मोटरनमन कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेमुळे मध्य रेल्वेच्या आणि हार्बर मार्गावरील जवळपास दीडशेपेक्षा अधिक लोकल सेवा रद्द झाल्या आहेत. ऐन सायंकाळच्या वेळी कार्यालयीन सुट्टी झाल्यानंतर घरी जाणाऱ्या नोकरदारांची मात्र पुरती तारांबळ उडाली आहे. मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे.

शुक्रवारी सकाळी मुरलीधर शर्मा पनवेल-सीएसएमटी लोकलमध्ये कर्त्यव्यावर होते. यादरम्यान सीएसएमटीकडे लोकल घेऊन जात असताना त्यांच्याकडून कुर्ला स्थानकात सिग्नल पासिंगची घटना घडली. घटना घडल्यानंतर त्यांची रेल्वे प्रशासनाकडून चौकशी सुरू होती. त्या भीतीने काही वेळातच मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी सीएसएमटी ते भायखळा स्थानक दरम्यान वेगाने येणाऱ्या प्रगती एक्सप्रेस समोर येत आत्महत्या केली