Mumbai Horror: दारु आणली नाही म्हणून महिलेकडून मुलाची हातोड्याने हत्या
Representational Image | (Photo Credits: PTI)

Mumbai Horror: मुंबईतील चेंबूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका 52 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामागील कारण म्हणजे महिलेने मुलाला दारु आणण्यासाठी सांगितली होती. परंतु त्याने ती आणली नाही म्हणून महिलेने त्याची हतोड्याने हत्या केली. ही घटना वाशानाका परिसरातील शनिवारी रात्री लुर्थमरी मुर्गेशन आणि तिचा मुलगा प्रवीण यांच्यामध्ये वाद झाल्याचे आरसीएफ पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांनी सांगितले.(वरळीतील गॅस  सिलिंडर फुटल्यामुळे लागलेल्या आगीत मृतांची संख्या 3 वर, 25 वर्षीय महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू)

प्रथम प्रवीण याने तिला मारले आणि नंतर तिने त्याच्या डोक्यात हातोडा मारत त्याची हत्या केली. असा प्रकार केल्यानंतर तिने घर बंद करुन तिच्या मित्राला माझा मुलगा हरवल्याचे सांगत, ती त्याच उद्या शोध घेईल असे सांगितले. ती नातेवाईकांकडे गेली आणि तेथे असलेल्या नवऱ्याला सुद्धा तेच सांगितले. परंतु तिच्या नवऱ्याला संशय आल्याचे त्यांनी सांगितले.(Buldhana Road Accident: पंढरपूर वरून परतणार्‍या भाविकांच्या टेम्पो ला अपघात; 15 जण गंभीर जखमी)

सोमवारी दुपारी जेव्हा ते दांपत्य घरी आले तेव्हा त्यांना प्रवीण यांचा रक्तबंबाळ झालेला मृतदेह घरात दिसून आला. तेव्हा पोलिसांना याबद्दल कळवले आणि महिलेला अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.