Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

पंढरपूर (Pandharpur) कडून भाविकांना घेऊन जाणारा एक टेम्पो डिवायडरला आदळून भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. टेम्पोच्या चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे यामध्ये 35 प्रवासी जखमी झाले आहे. दरम्यान बुलढाणा (Buldhana) मधील जळगाव जामोद (Jamod) तालुक्यामधील खांडवी (Khandvi) येथील मेटाडोरचे अनिल गणेश आणि विकास गणेश हे त्यांच्या गावातील 35-40 महिला-पुरूष भक्तांना घेऊन दर्शनासाठी पंढरपूरला गेले होते. तेथून परतताना रस्त्यामध्ये हा अपघात झाला आहे.

7 डिसेंबर दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. चालकाला गाडी चालवताना डुलकी लागली आणि गाडीवरील ताबा सुटला. ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला तर मेटाडोर रोडवरील दुभाजकावर गेले. गाडी विरुद्ध दिशेने वळून रोडवर पलटी झाली डिव्हायडरला आदळली. यामध्ये 20 जणांना किरकोळ तर 15 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. नक्की वाचा: Mumbai Road Accident: मद्यपी ड्रायव्हरने Bandra-Worli Sea Link वर गाडी ठोकल्याने एक महिला गंभीररित्या जखमी .

जखमींना चिखली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये अपघाताचं वृत्त समजताच स्थानिकांनीही जखमींना मदत केली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.