Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: PTI)

Mumbai Vaccination: राज्यात कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे. अशातच आता मुंबईतील सर्व शासकीय, महापालिकेच्या कोविड केंद्रावर फक्त महिलांसाठी येत्या 27 सप्टेंबरला महिलांसाठी लसीकरण असणार आहे. त्यामुळे महिलांना सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्या घराजवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेता येणार आहे. तसेच ज्या महिलांचा पहिला आणि दुसरा डोस राहिला आहे त्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

तसेच 28 सप्टेंबर रोजी 18 वर्षावरील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असणार आहे. तसेच दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत दुसरा डोस दिला जाणार आहे. तर सर्व पात्र नागरिकांनी आपल्यासोबत ओखळपत्र घेऊन येणे आवश्यक आहे. त्याचसोबत विद्यार्थी आणि शिक्षकांना त्यांच्या संस्थेचे ओळखपत्र सोबत घेऊन जावे लागणार आहे. (Covid-19 Update in Mumbai: मुंबई मध्ये आज 454 नव्या कोरोनाग्रस्तांची भर; 500 हून अधिक रुग्णांची कोरोनावर मात)

Tweet:

राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून 4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करुन शाळा सुरु होतील. ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागांत आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु होणार आहेत. यामुळे शाळा नेमक्या कधी सुरु होणार, या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थी पालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र महाविद्यालयं सुरु होण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. त्याचसोबत राज्यात मंदिरे, धार्मिक स्थळ सुद्धा सुरु केली जाणार आहेत.