Mumbai: विनोद कांबळी याला ऑनलाईन KYC च्या नावाखाली 1 लाखांचा गंडा
Vinod Kambali (Photo Credits-Twitter)

माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambali) याची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने विनोद कांबळी याला तो एका बँकेचा एक्झिक्युटिव्ह असल्याचे सांगितले आणि केवायसी अपडेटच्या (KYC Update) नावाखाली त्याला चुना लावला. विनोद कांबळी याच्या खात्यातून 1.1 लाखांहून अधिक रक्कम चोरीला गेली. ही रक्कम काढताना काही ट्रांजेक्शन सुद्धा झाल्याचे सांगण्यात आले आहे.(Mumbai Police: मुंबईत 1 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ पकडले, मुंबई पोलिसांकडून 24 वर्षीय तस्कराला अटक)

वांद्रे पोलिसांनी सायबरच्या पोलिसांसह बँकेची मदत घेत ट्रांजेक्शन बद्दल अधिक माहिती काढली. त्यानंतर वांद्रे सायबर पथकाने कोणत्या बँकेत पैसे ट्रान्सफर केले गेले याबद्दल शोधून काढले.विनोद कांबळी याला 3 डिसेंबरला एका व्यक्तीने फोन करत तो बँकेचा एक्झिक्युटीव बोलत असल्याचे सांगितले. त्यानुसार त्याला केवायसी अपडेट संदर्भात सांगितले.

पोलीस अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, Quick Support App डाउनलोड केल्यानंतर फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने विनोदच्या बँक खात्याची अधिक माहिती आणि ओटीपी सहज मिळवू शकला. जेव्हा फोन सुरु होता तेव्हा सुद्धा विनोद याच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर झाले.(Nashik Crime: नाशिकमध्ये शस्त्रे बाळगल्या प्रकरणी 7 पुजारी अटकेत, देशी बनावटीचे पिस्तूल, विळा, चाकू आणि हॉकी स्टिक जप्त)

कांबळी याने म्हटले की, मोबाईलवर जसे अलर्ट आले तेव्हाच तातडीने बँकेला कळवले आणि खाते ब्लॉक केले. त्यानंतर पोलिसांना या सर्व प्रकाराबद्दल सांगितल्यानंतर त्यांनी मदत करत माझे पैसे परत मिळाल्याचे कांबळी याने म्हटले आहे.