Kishori Pednekar: अजित पवार यांनीच सरकार पाडण्यास सांगितले, किशोरी पेडणेकर यांना आलेल्या धमकीच्या पत्रात उल्लेख
Kishori Pednekar | (Photo Credit: Twitter/ANI)

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Ex Mayor Kishori Pednekar) यांना पुन्हा एकदा धकमी देणारे पक्ष आले आहे. सरकार पडू दे.. नंतर तुला जीवे मारतो, अशी धमकी या पत्रात (Threat Letter देण्यात आली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनीच सरकार पाडण्यास सांगितले आहे, असा उल्लेखही या पत्रात करण्यात आला आहे. विजेंद्र म्हात्रे नामक व्यक्तीने ही धमकी देण्यात आली आहे. पत्रावरील पत्ता हा उरणचा आहे. किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना यापूर्वीही धमकी आली होती. आता पुन्हा तशीच पुनरावृत्ती झाली आहे. पत्रातील भाषा अत्यंत अश्लील आणि शिवीगाळ करणारी असल्याचेही पुढे आले आहे. किशोरी पेडणेकर यांनी या पत्राबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे.

किशोरी पेडणेकर यांना धमकी आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने पत्रात उल्लेख केला आहे की, या आधीचे पत्रही मीच पाठवले होते. सरकार पडू दे... नंतर तुला जीवे मारु. तुला जे करायचे आहे ते कर. तुला जर उद्धव ठाकरे यांना सांगायचे असेल तर त्यांनाही सांग, असेही या पत्रात म्हटले आहे. (हेही वाचा, Kishori Pednekar On Navneet Rana: आम्हाला वाटले बबली मोठी झाली मात्र ती अजूनही मुर्ख आहे, किशोरी पेडणेकरांची नवनीत राणांवर घणाघाती टीका)

किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र येण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीहा त्यांना धमकीचे पत्र आले होते. त्या पत्रातही त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. किशोरी पेडणेकर या मुंबईच्या महापौर झाल्यानंतर त्यांना आलेले हे धमकीचे तिसरे पत्र आहे. किशोरी पेडणेकर यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे.