मुंबई: 'दादर' च्या शिवाजी पार्क मध्ये रस्ते रंगवून दिले COVID-19 विषयी जनजागृती निर्माण करण्याचे धडे (See Photos)
शिवाजी पार्क (Photo Credits-File Image)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार स्वत:सह परिवाराची काळजी घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. तसेच राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मार्गदर्शक सुचना जाहीर करत काही गोष्टी सुरु करण्यास सुद्धा परवानगी दिली आहे. त्यामुळे नागरिकांना आता तब्बल दोन महिन्यानंतर घराबाहेर पडता येत आहे. याच पार्श्वभुमीवर मुंबईतील दादर (Dadar) मधील शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे कोरोना व्हायरस संबंधित जनजगृतीचा संदेश देणारे मेसेज रस्त्यांवर लिहिण्यात आले आहेत. त्यामुळे आता या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना आता कोरोना व्हायरस संबंधित करण्यात आलेली जनजागृती कामी येणार आहे.

शिवाजी पार्कात मोठ्या प्रमाणात नागरिक सकाळच्या वेळेसकिंवा संध्याकाळच्या वेळेस वॉकला येतात. मात्र कोरोनामुळे नागरिक घरी अडकून पडल्यानंतर आता  त्यांना घराबाहेर पडता येणार आहे. त्यामुळे आता जर नागरिक शिवाजी पार्कात आल्यास त्यांना रस्त्यावरील कोविड19 संबंधित जनजागृतीचे धडे देण्यात आल्याचे दिसून येणार आहेत. (COVID19: कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी Coro-bot नावाचा प्रायोगिक रोबो ठाण्यामध्ये तयार; पाहा संपूर्ण व्हिडिओ)

>>हस्तांदोनाला दुर सारा हाथ जोडून नमस्कार करा

शिवाजी पार्क (Photo Credits-File Image)

>>साबण व पाणी वापरुन हाथ स्वच्छ धुवा.

शिवाजी पार्क (Photo Credits-File Image)

>>कोरोना सोबत लढुया परिवाराचे रक्षण करुया

शिवाजी पार्क (Photo Credits-File Image)

>>वेळीच डॉक्टरकडे जाऊ, आरोग्याची चाचणी करुन घेऊ 

शिवाजी पार्क (Photo Credits-File Image)

>>बाहेरुन आल्यावर हात स्वच्छ धुवूया

शिवाजी पार्क (Photo Credits-File Image)

दरम्यान, मुंबईत सोमवारी  दिवसभरात 64 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आज 1314 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 50 हजार 85 वर पोहोचल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.