Aryan Khan Drugs Case: एनसीबी Shah Rukh Khan याच्या 'Mannat'वर, अनन्या पांडे हिलाही समन्स
NCB at Mannat | (Photo Credit: ANI)

मुंबईतील क्रुझ शीप ड्रग्ज प्रकरणी (Mumbai Cruise Ship Drugs Case) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (Narcotics Control Bureau) अजूनही कारवाई करत आहे. एनसीबीने (NCB) आज बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey ) हिच्या घरी जाऊन चौकशी केली. याशिवाय अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या मन्नत (Mannat) बंगल्यावर एनसीबी अधिकारी पोहोचल्याची माहिती आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी अनन्या पांडे हिच्या घरी जाऊन तिला समन्स दिल्याचे समजते. प्रसारमाध्यमांनी सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात दावा आहे की, आर्यन खान याच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये ज्या नवोदीत अभिनेत्रीचा उल्लेख होता ती अभिनेत्री अनन्या पांडे होती. मात्र, ती अनन्या पांडे असल्याबाबत ठोस माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही. एनसीबीने अनन्या पांडे हिला दिलेल्या समन्समध्ये आज (21 ऑक्टोबर) दुपारी 2 वाजता चौकशीसाठी बोलावले होते.

मीडिया रिपोर्टनुसार, ड्रग्ज प्रकरणी अनन्या पांडे हिच्यासह आर्यन खान आणि त्याची बहीण सुहाना हिचेही नाव पुढे आले आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, अनन्या पांडे हिच्या घरुन एनसीबीचे एक पथक शाहरुख खान याच्या 'मन्नत' बंगल्यावर पोहोचले आहे. ही टीम तिथे शोधमोहीम राबवत असल्याचे वृत्त आहे. एनसीबी टीम शाहरुखच्या मन्नतमध्ये चौकशी आणि शोधमोहीम राबवत असल्याची काही छायाचित्रेही व्हायरल झाली आहेत. (हेही वाचा, Mumbai Cruise Drugs Party Case: आर्यन खान, अरबाज मर्चेंट आणि मुनमुन धमेचा यांचा मुक्काम कारागृहातच, NDPS Court फेटाळला जामीन)

ट्विट

ड्रग्ज प्रकरणात अचानक अनन्या पांडे हिचे नाव आल्याचे पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. अनन्या पांडे ही अभिनेता चंकी पांडे याची मुलगी आहे. ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या 2019 मध्ये प्रदर्शीत झालेल्या चित्रपटातून तिने बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत पाऊल ठेवले. नंतर तिने ‘पती, पत्नी और वो’, ‘खाली पिली’ या चित्रपटातूनही काम केले आहे.

ट्विट

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात मुंबईतील क्रूझमधून अटक करण्यात आली आहे. त्याला मुंबई सेशन कोर्टाने जामीन दिला नाही. त्यामुळे आर्यन खान याचा पुढचा मुक्कामही तुरुंगातच असणार आहे. आर्यन खान याने केलेल्या जामीन अर्जावर मुंबई कोर्टात बुधवारी सुनावणी झाली. या वेळी कोर्टाने जामीन नाकारला. आर्यन खान याच्यासोबत अरबाज मर्चंड, मुनमुन धमेचा यांचाही जामीन कोर्टाने फेटाळला आहे. दरम्यान, आर्यन खानच्या जामीन अर्जावर आता 26 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तत्पुर्वी, अभिनेता शाहरुख खान मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी आर्थर रोड तुरुंगात गेला होता. ही भेट केवळ 10 मिनीटे झाली.