मुंबईच्या विशेष एनडीपीएस कोर्टाने ( Special NDPS Court) बॉलीवुड सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याचा जामीन अर्ज बुधवारी (20 ऑक्टोबर) फेटाळून लावला. याशिवाय या प्रकरणातील इतर दोन आरोपी अरबाज मर्चेंट (Arbaaz Merchant) आणि मुनमुन धमेचा (Munmun Dhamecha) यांचाही जामीन अर्ज न्यायालयाने नाकारला. आर्यन खान याचे वकील माहिती देताना म्हटले आहे की, विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्या विस्तृत निर्णयाची आम्ही प्रतिक्षा करत आहोत. आम्ही मुंबई उच्च न्यायालया दाद मागण्याबाबत विचार करत आहोत, असेही आर्यनच्या वकीलांनी म्हटले आहे.
न्यायालयाने आर्यन खान आणि एनसीबी अशा दोन्ही बाजूच्या विकिलांचे म्हणने 14 ऑक्टोबर रोजी ऐकून घेतल्यावर आपला निर्णय राखून ठेवला होता. पाठिमागच्या सुनावणी वेळी एनसीबीने न्यायालयात म्हटले होते की, आर्यन खान ड्रग्ज घेतो आणि त्याचे अनेक ड्रग्ज पेडलर्ससोबत संबंधही आहेत. (हेही वाचा, Aryan Khan याला जामीन मिळावा यासाठी भाजप आमदार राम कदम यांची प्रर्थना)
ट्विट
Drugs on cruise ship case | Mumbai’s Special NDPS Court rejects bail applications of Aryan Khan, Arbaaz Merchant and Munmun Dhamecha pic.twitter.com/Zww2mANkUB
— ANI (@ANI) October 20, 2021
नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ने आर्यन खान, अरबाज मर्चेंड आणि मुनमुन धमेचा यांना मादक पदार्थ बाळगल्या प्रकरणी तसेच हे पदार्थ बाळण्याचा कट रचने तसे अंमली पदार्थाचे सेवन, खरेदी विक्री आणि तस्करी केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. एनसीबीने क्रुझवर छापे टाकून तिघांनाही ताब्यात घेतले होते. तेव्हापासून आर्यन आणि मर्चंट हे ऑर्थर रोड कारागृहात बंद आहेत. तर, मुनमुन धमेचा भायकळा महिला कारागृहात बंद आहे. आर्यन खान आणि या प्रकरणात इतर आरोपींवर एनडीपीएस कायदा कलम 8 (सी),20 (बी), 27, 28, 29 आणि 35 अन्वये गुन्हा दाखल आहे. आरोपींना जामीनसाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागणार आहे. जोपर्यंत जामीन मिळत नाही तोवर आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना कारागृहातच बंद राहावे लागणार आहे.