Aryan Khan याला जामीन मिळावा यासाठी भाजप आमदार राम कदम यांची प्रर्थना
Aryan Khan याला जामीन मिळावा यासाठी भाजप आमदार राम कदम यांची प्रर्थना

मुंबई क्रूज डग्स पार्टी (Mumbai Cruise Drugs Party) प्रकरणात एनसीबी NCB) ने अटक केलेला आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आर्यन खान (Aryan Khan) याच्या जामीन अर्जावर आज (20 ऑक्टोबर) सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी 'आर्यन खान याला जामीन (Aryan Khan Bail) मिळावा ही प्रार्थना', असे ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमुळे आमदार राम कदम चर्चेत आले आहेत. ''प्रार्थना आहे की आज आर्यन खानला जामीन मिळावा. संविधान अन कायद्या प्रमाणे जामीन मिळणे हा एक मूलभूत अधिकार आहे'', असे राम कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आमदार राम कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''प्रार्थना आहे की आज आर्यन खानला जामीन मिळावा. संविधान अन कायद्या प्रमाणे जामीन मिळणे हा एक मूलभूत अधिकार आहे ही लढाई कोणा एक व्यक्ति विशेषच्या विरोधातील लड़ाई नाहीं अखंड मानव जातीची ड्रग्स विरोधी लढाई आहे. अपेक्षा होती महाराष्ट्र सरकार निदान ह्या खतरनाक ड्रग्स प्रकरणात ड्रग्स माफियांच्या विरोधात उभे राहतील मात्र वसूलीचा प्रभाव स्पष्ट दिसला. महबूबा मुफ्ती यांनी देखील याचा आगामी निवडणुकीसाठी याचा पुरेपूर उपयोग केला.जी ड्रग्सची नशा आपल्या सर्व युवकांना बरबाद करू शकते त्या विरोधात सर्व पक्ष आणी मानव जात एकत्र का येऊ शकत नाहीत. हे दुःख आहे''. (हेही वाचा, Cruise Drug Case: आर्यन खान याच्या बचावासाठी शिवसेना नेत्याची सुप्रीम कोर्टात धाव, NCB च्या भुमिकेवर उपस्थितीत केले प्रश्न)

राम कदम यांनी पुढच्या ट्विटमध्ये म्हटले आहे, ''आता बदललेल्या भारतात कोणी श्रीमंत गरीब,नेता,अभिनेता असो कायद्याच्या समोर सर्वे समान आहेत़.भविष्यात #आर्यन ने ज्या ड्रग्सचा कलंक त्याच्या बदनामी चे कारण झाले. त्याने ड्रग्सच्या विरोधात प्रखर लढाई उभी करून युवकांना ड्रग्स पासून दूर करण्यासाठी काम करून संकटाचे संधीत रूपांतर करण्यासाठी एक देशवासि या नात्याने शुभेच्छा''.

ट्विट

आर्यन खान याचे मुलभूत हक्क डावलले जात आहेत. त्याच्या हक्काचे संरक्षण करावे अशी मागणी करत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आर्यन खान याला त्याचे मुलभूत हक्क मिळावेत यासोबतच एनसीबीच्या भूमिकेचीही चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेनेने आपल्या याचिकेत केली आहे. आर्यन खान याच्या मुलभूत हक्कांचे उल्लंघन झाले आहे किंवा नाही याची चौकशी करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. शिवसेनेच्या किशोर तिवारी यांनी ही याचिका दाखल केली आहे.