दोन दिवसांपूर्वी मुंबईतील (Mumbai) सांताक्रूझ (Santa Cruz) परिसरातील देशात बॉम्बस्फोट (Bomb Blast) करण्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 506 (2) आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तरी फोन कॉल (Call) द्वारे ही धमकी देण्यात आली होती. संबंधित कॉलरचे (Caller) लोकेशन ट्रेस (Location Tress) करण्यास सुरुवात झाली. सांताक्रूझ येथे राहणाऱ्या रफत हुसेन नावाच्या व्यक्तीला व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल (What's App Video Call) केला आणि त्याला ‘बॉम्बस्फोट करना है इंडिया में विनाश है’ असे सांगितले.या फोन कॉलनंतर सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तक्रार घेऊन व्हॉट्सअॅपवर (Whats App) व्हिडिओ कॉल (Video Call) करणाऱ्या अज्ञात व्यक्ती गुन्हे शाखा तपास करत होती. तरी काल संध्याकाळी या अज्ञान कॉल करणाऱ्याच्या मुस्क्या आवळण्यात गुन्हे शाखेला (Mumbai Crime Branch) यश आलं.
अटक केलेल्या या आरोपीच नावं रणजितकुमार सहानी (Ranjeet Kumar Sahani) असं असून तो बिहारमधील (Bihar) रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. दक्षिण मुंबईतील (South Bombay) चर्नी रोड (Charni Road) परिसरातून या अज्ञात इसमास अटक करण्यात आली. तरी या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखा Mumbai Crime Branch) सखोल तपास करीत आहे. या प्रकरणात हा एकटाच सहभागी आहे की याचे काही साथिदार आहेत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. (हे ही वाचा:- Raj Thackeray On PFI: भारतात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्यास हिंदू शांत बसणार नाहीत, राज ठाकरेंचे गृहमंत्र्यांना पत्र)
Case registered against an unknown person for making a bomb threat call to a person in the Santacruz area of Mumbai. Case registered under 506 (2) IPC on the basis of the complaint from the person who received the call. Location of the caller traced: Mumbai Police
— ANI (@ANI) September 23, 2022
#UPDATE | Mumbai Crime Branch arrested the accused, Ranjit Kumar Sahani, a resident of Bihar for making a bomb threat call to a person in the Santacruz area of Mumbai & creating havoc. He was arrested in Charni Road area of South Mumbai. Investigation underway: Mumbai Police https://t.co/A5BqKPl909
— ANI (@ANI) September 24, 2022
रणजीत कुमारने व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल करून बॉम्बस्फोटाची धमकी दिली होती. गुन्हे शाखेने तपास केल्याप्रमाणे सहानीने हैद्राबादमधून कॉल केल्याचे सांगण्यात येत आहे. कॉल केल्यानंतर तो ट्रेनमध्ये चढला आणि मुंबईच्या दिशेने निघाला. सहानी मुंबईत पोहोचताच त्याचा शोध घेण्याचे काम गुन्हे शाखेने सुरू केले. तरी मुंबईसह देशात घातपात घडवून आणणार असल्याच्या बातम्या हल्ली रोज कानवर पडत आहेत. तरी प्रशासनच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.