महाराष्ट्रातील सत्ता कोंडी लवकरच सुटण्याचे विजय वडेट्टीवार यांचे संकेत; शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या संयुक्त बैठकीत एकसुत्री कार्यक्रम मसुद्याचा ठरला ड्राफ्ट
Shiv Sena, NCP, Congress | Photo Credits: Twitter/ ANI

Maharashtra Government Formation:  महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक मतदान निकाल 24 ऑक्टोबरला जाहीर झाला मात्र अद्याप कोणताच पक्ष सत्ता स्थापन करण्यास सक्षम नसल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. मतदारांनी शिवसेना - भाजपाला मतदारांनी कौल दिला असला तरीही मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच असल्याने आता शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस सोबत एकत्र येणार असल्याचं चित्र आहे. आज मुंबईमध्ये शिवसेना,कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांनी एकत्र येऊन एकसुत्री कार्यक्रम मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यात आल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान आज या बैठकीला शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे छगन भुजबळ यांच्यासह कॉंग्रेस नेते एकत्र जमले होते. 'महाशिवआघाडी' नैतिकतेला धरून नाही; शिवसेनेने स्वार्थासाठी राष्ट्रवादी व कॉंग्रेसचा हात धरला, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांच्या संयुक्त बैठकीमध्ये केवळ ड्राफ्ट बनवण्यात आला असून तो दिल्लीला वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्याचं कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. लवकरच शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये दिल्लीत भेट होणार असून अंतिम निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले. सध्या महाराष्ट्रासमोरील प्रश्न पाहता लवकरात लवकर स्थिर सरकार स्थापन करणं हा आमचा प्राधान्य असेल. मात्र अद्याप सत्ता वाटपावर बोलणी झाली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ANI Tweet 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती ठरणार मुहुर्त?

महाराष्ट्रातील सत्ता कोंडी लवकरात लवकर फूटणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिल्याने आता शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा (17 नोव्हेंबर) मुहूर्त साधत यंदा सत्ता स्थापनेचा दावा करणार का? अशी चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.

महाराष्ट्रामध्ये शिवसेना -भाजपाची महायुती तुटण्याच्या उंबरठ्यावर असताना आता राज्यात सत्ता स्थापनेसाठी नवी राजकीय समीकरणं जुळून येतील अशी चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात शिवसेना- कॉंग्रेस, राष्ट्रवादी पक्ष सत्ता स्थापनाचा कोणता फॉर्म्युला राबवणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे.