
मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक आज चाकरमान्यांच्या आज कामाच्या वेळेतच रखडल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सकाळी साडे नऊच्या सुमारास मध्य रेल्वेच्या रुळाला तडे गेल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक मंदावली आहे. कसारा आणि उंबरमाळी स्थानकादरम्यान रुळाला तडा गेल्यामुळे मुंबई कडे धावणाऱ्या लोकल उशिरा आहेत. यासोबतच बदलापूर -अंबरनाथ दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या त्रासामध्ये अजूनच भर पडली आहे. कुर्लाच्या दिशेने येणाऱ्या गाड्या उशिराने धावत आहेत.
मध्य रेल्वेने रुळाला तडे गेल्याचं समजताच तात्काळ दुरुस्तीचं काम हाती घेतलं. मात्र मध्य रेल्वेच्या लोकल सेवेसोबतच लांब पल्ल्याच्या गाड्याचं वेळापत्रक आज बिघडलेलं आहे. कसाराहून मुंबई दिशेने येणाऱ्या गाड्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे रेल्वे सोबतच प्रवाशांचेही वेळापत्रक कोलमडले आहे.
मध्य रेल्वेच्या गाड्या १५-२० मिनिटं उशिराने धावत आहेत.