Mumbai Boys Drown: मुंबईत माहीमच्या समुद्रात 5 मुलं बुडाली, अग्निशमन दलाकडून शोध सुरु
Drowning (PC - Pixabay)

मुंबईतील माहीम समुद्रात 5 जण बुडाल्याची घटना घडली आहे. समुद्रात बुडालेल्या 4 जणांना वाचविण्यात यश आलं आहे. मात्र, यातील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर एका बेपत्ता विद्यार्थ्याचा शोध सुरु आहे. सर्व तरुण कॉलेजमधील विद्यार्थी आहेत.  धुलीवंदनानिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थी मुंबईतील माहीम समुद्र किनाऱ्यावर आले होते. महाविद्यालयीन विद्यार्थी पोहण्यासाठी समुद्रात गेले. मात्र, समुद्रात गेलेल्या या पाच विद्यार्थ्यांचा तोल गेला. यामुळे पाचही विद्यार्थी समुद्रात बुडाले.  (हेही वाचा - Mumbai News: फिरण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांसोबत घडला घात, खदानीत सापडला एकाचा मृतदेह, दुसरा बेपत्ता)

कॉलेजात शिकणारे सर्व मुलं समुद्रकिनारी फिरायला गेली होती. त्यानंतर हा प्रकार घडलाय. एकाला शोधण्यात यश, तर दुसऱ्याचा अग्निशमन आणि सागरी सुरक्षा पोलीस घेत आहेत . शोध घेतलेल्या एका मुलाला जवळच हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  घटनास्थळी माहीम पोलीस, अग्निशामक दलाचे पथक,सागरी पोलीस आणि स्वयंसेवक उपस्थित आहेत.

या घटनेची माहिती मिळताच समुद्रात बुडालेल्या पाच पैकी ४ जणांना वाचविण्यात यश आलं. त्यातील २ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आलं. तर दोघांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यातील हर्ष किंजले नावाच्या विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर होती. याच विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या विद्यार्थ्यांपैकी पाचवा विद्यार्थी यश कागडा नावाच्या तरुणाचा शोध सुरु आहे. यश बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.