![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/04/Untitled-design-84-380x214.jpg)
Mumbai News: मुंबईच्या दहिसर येते दोन मुलांसोबत दुर्घटना घडली आहे. पूर्वेकडील हनुमान टेकडी येथील खदानीतील पाण्यात दोन तरुण बुडसल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दल आणि बचाव कार्य घटनास्थळी दाखल झाले. जवांनानी बुडलेल्या एका तरुणाचा मृतदेह बाहेर काढला आहे. परंतु दुसऱ्या तरुणाचा अद्याप शोध नाही. (हेही वाचा- तरुणींनी चालू दुचाकीवर 'रंग लगा दे' गाण्यावर डान्स मूव्हज करत साजरी केली होळी)
मिळालेल्या माहितीनुसार,मनोज रामचंद्र सुर्वे (45) असं खदानीत बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर चिंतामण वारंग या तरुणाचा अद्याप शोध सुरु आहे. दोन्ही तरुण पाण्यात पोहण्यासाठी आणि परिसर फिरण्यासाठी गेले होते. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. पाण्यात पोहण्यासाठी दोघे ही खदानीत उतरले होते. पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने दोघे ही पाण्यात बुडले.
घरच्यांना दोघे ही बेपत्ता असल्यामुळे शोध सुरु केला. घटनास्थळी बचाव कार्य दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर हनुमान टेकडी येथील खदान येथे शोध सुरु केला तेव्हा मनोज रामचंद्र सुर्वे यांचा मृतदेह सापडला. घटनास्थळावरून दुसऱ्या तरुणाचा शोध सुरु आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे परिसरात होळीचा सण साजरा करत असताना ही घटना घडली.