Viral Video: आज देशभरात धुळीवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अशातचं आता सोशल मीडियावर दोन तरुणींचा होळीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या चालू दुचाकीवर 'रंग लगा दे' गाण्यावर डान्स मूव्ह करताना दिसत आहेत. व्हिडिओ क्लिपमध्ये एक तरुण स्कूटी चालवताना दिसत आहे. त्याच्यामागे बसलेल्या दोन तरुणी रंग लगा दे गाण्यावर डान्स मूव्ह करत एकमेकींना मिठी मारताना दिसत आहे. @Mohd_Aqib9 या वापरकर्त्याने हा व्हिडिओ शेअर केला असून त्याने व्हिडिओतील तरुण-तरुणींवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच त्याने हा व्हिडिओला यूपी पोलिसांना टॅग केलं आहे. यावर यूपी पोलिसांनी रिट्विट करत कारवाई करण्यात येईल, असं आवाहन केलं आहे. या व्हिडिओवर नेटीझन्सकडूनही कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. (वाचा - Girl's Holi Video from Delhi Metro: दिल्ली मेट्रो मध्ये मुलींच्या होळी सेलिब्रेशनचा व्हिडिओ चर्चेत (Watch Video) )
पहा व्हिडिओ -
#HoliCelebration@uptrafficpolice @Uppolice @dtptraffic
गाड़ी नंबर - (UP16C - X0866)
बिना हेलमेट इए ड्राइविंग ट्रिपिंलिंग और स्टंट किया जा रहा है आपसे अनुरोध है इन लोगो पर करएवाही करें @zoo_bear @WasimAkramTyagi @007AliSohrab pic.twitter.com/FpJXzGWtfr
— Shiekh Mohd Aqib (@Mohd_Aqib9) March 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)