Mumbai: मुंबईतील साहित्य चाचणी लॅब एनएबीएल प्रमाणपत्राची मानकरी, केंद्र सरकारकडून एनएबीएल बहुमान पटकावणारी बीएमसी राज्यातील पहिली महापालिका
BMC (File Image)

कोरोना (Corona) काळात मुंबई महापालिकेच्या (Mumbai BMC) अन्न आणि पाण्याची गुणवत्ता तपासणाऱ्या लॅबने एनएबीएल प्रमाणपत्राची (NABL Certificate) मानकरी ठरत संकट काळात देखील तत्पर असल्याची पोचपावती मुंबई महापालिकेस मिळाली होती. पण आता अन्न आणि पाण्याची गुणवत्ता तपासणाऱ्या लॅब पाठोपाठचं रस्ते, पुल तसेच सर्व प्रकारच्या इमारत बांधकामाच्या साहित्य चाचणी लॅबने देखील एनएबीएल प्रमाणपत्र आपल्या नावी नोंदवत , केंद्र सरकारकडून (Central Government) एनएबीएल बहुमान पटकावणारी बीएमसी राज्यातील पहिली महापालिका  ठरली आहे.  यानंतर मुंबई महापालिके (BMC) अंतर्गत काम करत असणाऱ्या विविध लॅब सर्वोत्तम काम करत असल्याचा शिक्कामोर्तब झाला आहे. तरी केंद्र सरकारकडून या लॅबचं मोठ कौतुक करण्यात आलं आहे. मुंबई महापालिके प्रमाणे राज्यातील इतर महापालिकेने देखील याप्रमाणे काम करावं असं एक उदाहरण तपासणी लॅबने राज्यापुढे ठेवलं आहे.

 

मुंबई महापालिका (BMC) परिसारात जे काही बांधकाम होतात त्यासाठी लागणार विविध साहित्याची चोख तपासणी व्हावी असा मुंबई महापालिकेचा (Mumbai Mahapalika) नियम आहे. मुंबईतील वरली (Worli) परिसरात स्थापित असलेली ही लॅब 1958 साल पासून हे काम बघते तरी एनएबीएल प्रमाणपत्रासह (NABL Certificate) आता मुंबई महापालिकेच्या या लॅबला कामाची पोचपावती मिळाली आहे. (हे ही वाचा:- MITRA Commission: नीती आयोगाच्या धोरणाशी सुसंगत राज्यात 'मित्र' संस्थेची स्थापना होणार, राज्य सरकारकडून मंजूरी)

 

संबंधित लॅबचे आता अत्याधुनिकरण करण्यात येणार असुन त्यासाठी मुंबई महापालिकेकडून दोन हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच बांधकामात वापरण्यात येणार असलेल्या वस्तूंची चोख तपासणी होत असल्याने सर्वसामान्यांची फसवणूक होणार नाही यासाठी ही लॅब कार्यरत आहे. तरी पुढील महिन्यापासून म्हणजे डिसेंबर पासून या लॅबमध्ये आणखी १५० चाचण्या वाढवण्यात येणार आहेत. त्यामुले लॅबच्या महसूलात देकील दुपटीने वाढ होण्याची सक्यता वर्तवण्यात येत आहे.