सध्या समुद्राच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे जगातील अनेक शहरांना धोका निर्माण झाला आहे. समुद्राची पाणी पातळी वाढल्याने जगभरातील अनेक शहरे 2050 पर्यंत पाण्यात जाण्याची शक्यता आहे. याचा परिणाम मुंबई शहरावरही होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई शहर पाण्याखाली जाणार असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. शास्त्रज्ञांनी सॅटेलाइटमधून आलेल्या फोटोंवरून हा निकष काढला आहे. न्यूयॉर्क टाइम्सने (New York Times) दिलेल्या वृत्तानुसार, सॅटेलाइटच्या मदतीने समुद्रातील पाण्याच्या स्तराची मोजणी करण्यात आली आहे. त्यावरून हा स्तर वाढत असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे. हा रिसर्च ‘जर्नल नेचर कम्युनिकेशन’ने (Nature Communications) प्रकाशित केला आहे.
हेही वाचा - World Water Day 2019: यंदा ‘Leaving no one behind’ थीमवर साजरा होणार जागतिक जल दिन
या संशोधनानुसार, समुद्राच्या पाण्याचा स्तर वाढल्यामुळे जगभरातील 15 कोटी लोकांना फटका बसणार आहे. समुद्राच्या वाढत्या पाणी पातळीचा परिणामामुळे मुंबईचा बराचसा भाग पाण्याखाली जावू शकतो. या संकटापासून मुंबईला वाचवण्यासाठी योग्य उपाययोजना आखता येऊ शकतात. परंतु, त्याची तयारी आतापासूनचं करावी लागेल, असं ‘कॉर्डिनेटर डायना लोनेस्को’ या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संस्थेने म्हटले आहे.
हेही वाचा - खुशखबर! मुंबईत लवकरच सुरु होणार Water Taxi; प्रवासाचा वेळ होणार दीड तासावरून अर्धा तास; जाणून घ्या मार्ग
या संशोधनानुसार, आशिया खंडातील शांघाय देश पूर्णत: पाण्याखाली जावू शकतो. तसेच यामुळे शांघायमधील 11 कोटी लोकांचे पुर्नवसन करावे लागेल. ही परिस्थिती सत्यात उतरल्यास शांघाय देशाला वाचवणे कठीण होणार आहे. शांघायसह अॅलेक्जेंड्रिया या देशावरही 2050 पर्यंत मोठे संकट येऊ शकते, असंही या संशोधनात सांगण्यात आलं आहे. या संशोधनानुसार, समुद्राची पातळी वाढली तर सर्वात जास्त फटका मुंबई शहराला बसणार आहे.