मुंबई विमानतळ (Image: PTI)

मुंबई विमानतळावरून ये-जा करण्याऱ्या प्रवाशांची आज थोडीशी गैरसोय होण्याची शक्यता आहे. तसेच विमानांचे उड्डाणही उशिराने होणार आहे. कारण आज मुंबई विमानतळाची धावपट्टी म्हणजेच रनवे तब्बल 6 तासांसाठी बंद असणार आहे. ही धावपट्टी 11 ते  5 या कालावधीमध्ये बंद असणार आहे.

मुख्य आणि दुय्यम धावपट्टी देखभाल-दुरुस्तीच्या कारणास्तव तब्बल सहा तास बंद असणार आहे. फेब्रुवारी-मार्च आणि ऑक्टोबर महिन्यात धावपट्टीचे दुरुस्तीचे काम केले जाते. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात काम आज होणार आहे. ही माहिती MIALकडून 4 ऑक्टोबरलाच देण्यात आली होती. (हेही वाचा : आता गिफ्ट देऊ शकता ही 2 हजार पेक्षा कमी किमतीची हटके गॅजेट्स)

दिवसाला सरासरी 1000 उड्डाणे होत असलेल्या या विमानतळाची धावपट्टी बंद राहणार असल्याचा थेट परिणाम, जवळ जवळ 300 विमानांच्या उड्डाणावर होणार आहे. त्यामुळे काही विमानफेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, अनेक विमानांच्या फेऱ्यांची वेळ बदलण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई विमानतळावरील मुख्य आणि दुय्यम धावपट्टी बंद राहण्याबद्दलच्या अधिक तपशीलासाठी एअर इंडियाची वेबसाइट, ऍप किंवा कॉल सेंटरला भेट देण्याचे आवाहन एअर इंडियाने आपल्या प्रवाशांना केले आहे