Arrested

मुंबईतील (Mumbai) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन (CSMT Airport) जाणाऱ्या 34 वर्षीय गिनी (Guniea) नागरिकाकडून 2.935 किलोच्या कोकेनची (Cociane) तस्करी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत तब्बल 18 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.(TRP Rigging Scam: टीआरपी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र दाखल)

अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, अटक करण्यात आलेल्या नागरिकाला येत्या 8 डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर विशिष्ट सुचनेच्या आधारावर मंगळवारी दुपारी डीआरआयने दुबईमार्गे अदीस अबाबा येथून मुंबईत आलेल्या मूसा कॅमारा याला विमानतळावर अडवण्यात आले. त्यांनी पुढे असे ही म्हटले की, आरोपीच्या सामानाची तपासणी केली असता त्याच्या ट्रॉलीमध्ये लपवण्यात आलेल्या 2.9 किलोग्रॅमचे कोकने आढळले.(Human Trafficking: मंदिर असलेल्या शहरांमध्ये मानवी तस्करी? मुंबई उच्च न्यायलयाचे महाराष्ट्र पोलिसांना तपासाचे आदेश)

कोकोनची किंमत तब्बल 18 कोटी रुपये असल्याचे तपासात समोर आले आहे. कॅमारा याला नारकोटिक ड्रग्ज अॅन्ड सायकोट्रॉपिक सब्सटांजेस कायदा 1985 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. तर याआधीच सुद्धा मंगळवारीच डीआरआयने एका मलावी महिलेकडून एक किलो कोकेन जप्त केले होते. तर अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, डीआरआयने गेल्या 10 दिवसात जवळजवळ 4.5 किलोग्रॅमचे अंमली पदार्थ जप्त केले असून त्याची किंमत 27 कोटी रुपये आहे.