MSRTC | (Photo credit: archived, edited, representative image)

महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ (MSTRTC) 1 जानेवारी 2025 रोजी आपल्या ताफ्यात 1,300 नवीन बसेस समाविष्ट करत आहे. एमएसआरटीसीचे अध्यक्ष भरत गोगावले (Bharatshet Gogawale) यांनी हा उपक्रम महाराष्ट्रातील जनतेला 'नवीन वर्षाची भेट' (New Year Gift) असल्याचे म्हटले आहे. लाल परी (Lal Pari) नावाने सामान्यांमध्ये परिचीत असलेल्या एमएसआरटीसीचा उल्लेख करत गागावले (Bharatshet Gogawale) म्हणाले, 'या नवीन बसेस महाराष्ट्रातील सामान्य लोकांसाठी नवीन वर्षाची भेट आहे, जे प्रवासासाठी महामंडळाची सार्वजनिक सेवा वापरतात. प्रवाशांसाठी सुरक्षित आणि अधिक आरामदायक प्रवास सुनिश्चित करून राज्याच्या सार्वजनिक वाहतूक सेवांचे आधुनिकीकरण आणि विस्तार करणे हा या निर्णयाचा उद्देश, असल्याचेही ते म्हणाले.

राज्य वाहतुकीच्या आधुनिकीकरणासाठी प्रयत्न

भरत गोगावले यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बसेस सुरू करणे हा राज्य वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रयत्नांचा एक भाग आहे. 'हे काही एका रात्रीत घडलेले नाही. हे प्रयत्न दोन वर्षांपासून सुरू आहेत. प्रत्येक प्रवाशाला सुरक्षित आणि आरामदायी प्रवास प्रदान करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत ", असे ते म्हणाले. सुमारे 1, 300 बसेसपैकी सुमारे 450 बसेस नाशिक-संभाजीनगर, नागपूर-अमरावती आणि मुंबई-पुणे भागासह विशिष्ट प्रदेशांना सेवा पुरविणार आहेत, ज्यामुळे राज्यभर अधिक चांगली कनेक्टिव्हिटी सुनिश्चित होईल, असेही ते म्हणाले.

कोविड नंतरच्या ताफ्याचे पुनरुज्जीवन

कोविड-19 महामारीपूर्वी, एमएसआरटीसी ने 18,500 बसेसचा ताफा चालवला होता, ज्यामध्ये 15,500 बसेस सेवेत होत्या, ज्या दररोज सुमारे 65 लाख प्रवाशांना सेवा पुरवत होत्या. दरम्यान, जुन्या वाहनांमुळे आणि नवीन वाहनांच्या कमतरतेमुळे ताफ्याचा आकार 1,000 बसींनी कमी झाला, ज्यामुळे प्रवाशांची संख्या दररोज 54 लाखांवर आली.

एसटी महामंडळाकडून अधिकृत निवेदन जारी

एमएसआरटीसी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, जास्त मागणी असूनही बसेसच्या कमतरतेमुळे एमएसआरटीसीला अनेक वर्षांपासून तोटा सहन करावा लागत आहे. नवीन बसेसच्या समावेशामुळे ताफ्याचे पुनरुज्जीवन होईल, आर्थिक तोटा भरून निघेल आणि प्रवासी सेवांमध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे.

परवडणाऱ्या आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतुकीची उपलब्धता सुधारत असताना प्रवाशांचे प्रवासाचे ओझे कमी करून त्यांना लाभ मिळवून देणे हे नवीन बसेसचे उद्दिष्ट आहे. "महाराष्ट्रातील गरीब लोक जे लाल परी सेवांवर अवलंबून आहेत, त्यांना केवळ विस्तारित ताफ्याचाच फायदा होणार नाही तर आर्थिक ताणही कमी जाणवेल", असे निवेदनात म्हटले आहे. या प्रयत्नांमुळे, एमएसआरटीसीला प्रवाशांचा आत्मविश्वास परत मिळण्याची आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्तकेला जात आहे. मात्र, महामंडळाच्या या नव्या बदलांचे प्रवाशांकडून कसे स्वागत होते याबातब उत्सुकता आहे.