MPSC Prelims | PC: Pixabay.com

एमपीएससी (Maharashtra Public Service Commission) कडून घेण्यात येणार्‍या राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 ची अ‍ॅडमीट कार्ड्स (Admit Card) जारी करण्यात आली आहेत. ही परीक्षा यंदा 2 जानेवारीला आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांना एमपीएससीची अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in यावर आपली हॉलतिकीट्स पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे.

दरम्यान राज्य सेवा पूर्व परीक्षा देणार्‍या उमेदवारांना यंदा परीक्षेच्या दिवशी दीड तास आधी पोहचण्याचं आवाहन करण्यात आले आहे तर प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्यापूर्वी परीक्षा केंद्रावर स्वतःच्या बैठक क्रमांकावर एका तास आधी पोहचणं अनिवार्य करण्यात आलं आहे. यंदा कोविड 19 चा धोका पाहता विद्यार्थ्यांसाठी विशेष नियमावलीचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नक्की वाचा: MPSC Exam 2021: खुशखबर! महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत 900 पदांची भरती; 'एमपीएससी'ने प्रसिद्ध केली जाहिरात, जाणून घ्या पदांची नावे व महत्वाच्या तारखा  .

एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षा ची अ‍ॅडमीड कार्ड्स कशी कराल  डाऊनलोड?

  • एमपीएससीची अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in ला भेट द्या.
  • होम पेज वर उजव्या बाजूला दिसणार्‍या लॉगिन टॅब वर क्लिक करा.
  • रजिस्टर इमेल आयडी किंवा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून एमपीएससीची हॉल तिकीट डाऊनलोड करा.
  • आता तुमच्या हॉल तिकीटांना भविष्यात वापरासाठी प्रिंट आऊट काढून ठेवू शकतात.

एमपीएससी ची राज्य सेवा पूर्व परीक्षा ही 100 मार्कांची असते. यामधून उर्तीर्ण झालेल्या आणि पात्र उमेदवारांना पुढील टप्प्यांमधील परीक्षा देण्यासाठी उर्तीर्ण केले जाते. यामध्ये सामान्य ज्ञानावर आधारित 100 गुणांची परीक्षा असते. एका तासाच्या कालावधीमध्ये हे 100 प्रश्न सोडवायचे असतात. यामध्ये निगेटीव्ह मार्किंग सिस्टीम नाही.